शहरं
Join us  
Trending Stories
1
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
3
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
4
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
5
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
6
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
7
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
8
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
9
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
10
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
11
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
13
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
15
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
16
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
17
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
18
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
19
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
20
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती

सैन्य भरतीच्या नावाखाली बेरोजगारांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 11:17 AM

मागील सहा महिन्यापासून सैन्य भरतीच्या नावाखाली बेरोजगार युवकांची दिशाभूल सुरू आहे. फक्त नागपुरातच नव्हे तर देशभरातील सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार सुरू आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियावर बोगस संदेशटीए बटालियनमध्ये भरती असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील सहा महिन्यापासून सैन्य भरतीच्या नावाखाली बेरोजगार युवकांची दिशाभूल सुरू आहे. फक्त नागपुरातच नव्हे तर देशभरातील सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार सुरू आहे. सैन्य भरतीच्या नावाखाली व्हायरल झालेल्या संदेशात टीए बटालियन नागपूरमध्ये भरती होणार असल्याचे म्हटले आहे. संदेशात शैक्षणिक पात्रता व शारीरिक मापदंडाची माहिती व तारीखही देण्यात आल्याने युवकांची दिशाभूल सुरू आहे. यामुळे सेनाधिकारी सतर्क झाले आहेत.अलिकडेच १८ फेब्रुवारीला असा संदेश सोशल मीडियावरून पुन्हा व्हायरल झाला. यात जीडी (जनरल ड्यूटी) व ट्रेडमन पदााठी २० ते २४ फेब्रुवारीपर्यंत नागपुरात भरती होणार असल्याचे म्हटले आहे. जीडीची २१३ पदे व ट्रेडमनची ६३ पदांच्या या जाहिरातीत शारीरिक पात्रता व आवश्यक दस्तावेजाची माहिती देण्यात आली आहे. जाहिरातीअखेर एका महिलेचे छायाचित्र देण्यात आले असून सुरेखा म. पाटील, नगरसेविका, वॉर्ड क्रमांक २७ असा परिचय देण्यात आला आहे. हा संदेश वाचल्यावर अनेकजण चौकशीसाठी नागपुरात पोहचले. रेल्वे स्टेशनजवळील एआरओ कार्यालयातही चौकशी केली. या खोट्या जाहिरातीमुळे सीताबर्डी किल्ल्यापुढे अनेक उमेदवार जमले होते. या पार्श्वभूमीवर रक्षा मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी ग्रुप कॅप्टन बसंतकुमार पांडे यांनी अशा प्रकारची कोणतीही भरती प्रकिया नसल्याचे स्पष्ट केले आहे. टी ए ची भरती सेना भरती कार्यालयाकडूनच केली जाते. त्याची जाहिरात वर्तमानपत्रांमधून वेळोवेळी दिली जाते. त्यामुळे यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.हा कटकारस्थानाचा भाग तर नव्हे?बटालियनमधील भरतीचा संदेश वारंवार व्हायरल करण्यामागे हा एखाद्या कटकारस्थानाचा भाग तर नव्हे, अशी शंका उपस्थित केली जात आहे. दोन महिन्यापूर्वी अशाच प्रकारचा एक संदेश सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता. त्यानंतर देशभरातून शेकडो युवक नागपुरातील एआरओ कार्यालयात पोहचले होते. प्रकार खोटा असल्याचे लक्षात आल्यावर काही युवकांनी गोंधळ घालण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र समजूत घालून सर्वांना परत पाठविण्यात आले होते. आता पुन्हा दुसऱ्यांदा असाच प्रकार घडल्याने शंका उपस्थित होत आहे.

नागपुरात टीए बटालियन नाहीनागपुरात पूर्वी टीए बटालियनचे कार्यालय होते. येथून सैन्यासाठी भरती प्रक्रियाही राबविली जात असे. याची अधिकृत माहिती विविध प्रसार माध्यमातून दिली जात असे. मात्र चार महिन्यांपूर्वी नागपुरातून टीए बटालियन स्थानांतरित झाली आहे. मात्र नागपूरसह देशातील अनेक युवकांना याची कल्पना नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील हा संदेश खरा समजून बेरोजगार युवक भरतीसाठी नागपुरात पोहचत आहेत.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभाग