काेंढाळी : आराेपीने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना ३ नाेव्हेंबर २०१८ ला घडली हाेती. दरम्यान, काेंढाळी पाेलिसांनी बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीस मध्य प्रदेश येथून ताब्यात घेत आराेपीला अटक केली.
शुभम कन्हैयालाल काेकाेडे (२१, रा. धामणा) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. काेंढाळी पाेलीस ठाण्यांतर्गत एका १७ वर्षीय मुलीला काेणते तरी आमिष देऊन आराेपीने पळवून नेले. मुलीच्या बेपत्ता असण्याबाबत तिच्या वडिलांनी काेंढाळी ठाण्यात तक्रार नाेंदविली होती. त्याआधारे पाेलिसांनी तपास सुरू केला हाेता. दरम्यान पाेलिसांनी मुलीच्या माेबाइल लाेकेशनच्या आधारे सायबर सेलच्या मदतीने मध्य प्रदेशातील सुकबरा, ता. कुरई, जि. शिवनी येथून बेपत्ता मुलीला ताब्यात घेतले. तसेच तिला पळवून नेणारा आराेपी शुभम काेकाेडे यास अटक केली. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक रामम ढगे, पाेलीस नाईक संताेष राठाेड, रणजित जाधव यांच्या पथकाने केली.