नागपूर : मिशन जीवन रक्षकच्या माध्यमातुन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) ने एप्रिल-ऑक्टोबर २०२३या कालावधीत ६६ जणांचे प्राण वाचविले. यात नागपूर विभागात १४, मुंबई विभागात १९,भुसावळ विभागात १३, सोलापूर विभागात ५ आणि पुणे विभागात १५ जनांचा सामावेश आहे.
रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त, "अमानत" या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफने त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन गरजू प्रवाशांना मदत केली आहे. त्यांचे हरवलेले किंवा मागे राहिलेले सामान, रोख, दागिने, मोबाईल फोन, लॅपटॉप, यासारख्या मौल्यवान वस्तू परत मिळवून दिल्या आहेत.
यंदा एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान, ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत, आरपीएफने ८५७ प्रवाशांचे सामान परत मिळवले आहे. त्याची किंमत २.७७ कोटी रुपये आहे. इतर विभागांवर परत मिळवलेल्या प्रवाशांच्या सामानाचे मूल्य आहे. भुसावळ विभाग १८२ प्रवाशांचे ५०.४५ लाख किमतीचे सामान नागपूर विभाग १६८ प्रवाशांचे ३६.९७ लाख किमतीचे सामान, पुणे विभाग ५८ प्रवाशांचे १३.९४ लाख किमतीचे सामान तर सोलापूर विभागात ७२ प्रवाशांचे १३.९९ लाख किमतीच्या सामानाचा सामावेश आहे. मध्य रेल्वेचे आवाहन
रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, ट्रेनच्या वाहतुकीत अडथळा इत्यादी सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. प्रवाशांनी त्यांना सहकार्य करावे तसेच प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून चढू किंवा उतरू नये असे आवाहन केले आहे.