कोलकाता : भाजपमध्ये प्रवेश घेणारे मिथुन चक्रवर्ती हे आता कोलकात्याचे अधिकृत मतदार झाले आहेत. मुंबईच्या मतदारयादीत त्यांची अगोदर नोंद होती. मात्र, त्यांनी तेथून स्वत:चे नाव काढून काशीपूर येथून मतदार म्हणून नोंदणी केली. त्यांनी माझ्या घराच्या पत्त्यावर मतदार म्हणून नोंदणी केली आहे. ते जेव्हाही पश्चिम बंगालमध्ये येतात तेव्हा माझ्या घरीच त्यांचा निवास असतो, अशी माहिती त्यांची बहीण शर्मिष्ठा सरकार यांनी दिली. मिथुन विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार का? यासंदर्भात विविध कयास लावण्यात येत आहेत. मात्र भाजपने याला दुजोरा दिलेला नाही. मिथुन चक्रवर्ती कोलकात्याचे मतदार झाले याचा अर्थ ते निवडणूक लढतील असा होत नाही. त्यासंदर्भात पक्ष निर्णय घेईल, अशी माहिती पक्षाचे नेते स्वपन दासगुप्ता यांनी दिली.
मिथुन चक्रवर्ती झाले कोलकात्याचे मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:08 AM