शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
4
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
5
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
6
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
7
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
8
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
9
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
10
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
11
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
12
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
13
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
14
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
15
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
16
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
17
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
18
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
19
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
20
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?

"देशात कुठेही लोकशाही दिसत नाही", जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवरून आदित्य ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 5:34 PM

जे सरकारच्या विरोधात भूमिका घेत आहे, त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून माजी पर्यावरण मंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारसह राज्यातील शिंदे सरकारवर टीका केली आहे. या देशामध्ये जे कोणी सत्यासोबत उभे आहे किंवा जे कोणी खरं बोलत आहे, किंबहुना जे सरकारच्या विरोधात भूमिका घेत आहे, त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव असल्याचे त्यांनी सांगितले. हा पॅटर्न देशभरात सर्वत्र सुरू असून कुठेही लोकशाही दिसत नसल्याची टीका त्यांनी केली. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. 

आयएल ॲण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी जयंत पाटील यांना सोमवारी ईडी चौकशीसाठी बोलावण्यात आले. आयएल अँड एफएसच्या कोहिनूर सीटीएनएल मधील गुंतवणुकीसंदर्भात ही चौकशी होते आहे. कोहिनूर सीटीएनएलतर्फे मुंबईतल्या दादर इथे कोहिनूर स्क्वेअरची उभारणी सुरू आहे. ईडीने यासंदर्भात २०१९ मध्ये तपास सुरू केला. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरनंतर ईडीने तपास हाती घेतला. यावर बोलताना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

आदित्य ठाकरे नागपूर दौऱ्यावर महाराष्ट्रामध्ये एका घटनाबाह्य सरकारविरूद्ध आम्ही लढत असल्याचे त्यांनी सांगितले. जयंत पाटलांना त्रास दिला जातोय का या प्रश्नावर बोलताना, खोक्यांबद्दल त्यांनाच विचारा, नोटबंदीमुळे त्रास वाढलाय का असा टोला ठाकरे यांनी राज्य सरकारला लगावला. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते प्रदूषित गावांची पाहणी करणार असून स्थानिकांशी संवाद साधणार आहेत.  

नेमकं काय आहे प्रकरण?आयएल ॲण्ड एफएस कंपनीमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी २०१९ मध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने व मुंबईच्या सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसने आयएल ॲण्ड एफएस कंपनीविरोधात गुन्हा नोंदवला होता. त्याच प्रकरणी २०१९ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीने चौकशी केली होती. आयएल ॲण्ड एफएस कंपनीमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी २०१९ मध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने व मुंबईच्या सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसने आयएल ॲण्ड एफएस कंपनीविरोधात गुन्हा नोंदवला होता. 

 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारnagpurनागपूर