नागपूर : उद्धव ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्रिपद भूषविलेले अचलपूर-चांदूरबाजार मतदारसंघाचे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना गुवाहाटीची कामाख्या देवी खरेच पावली आहे. एका महिन्यात त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील दोन पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून निधी खेचून आणला. त्याशिवाय कडू यांच्या मागणीनुसार दिव्यांगांसाठी कल्याण विभागही सरकारने गठीत केला आहे.
राज्य सरकारच्या ३ नोव्हेंबरच्या कॅबिनेट बैठकीत सापन प्रकल्पाच्या ४९५.२९ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता दिली होती. त्याचा लाभ ३४ गावांना होणार असून ६ हजार ३८० हेक्टर सिंचन होणार आहे. मंगळवारी वासनी प्रकल्पाच्या ८२६ कोटींच्या सुधारित खर्चाला मान्यता मिळाली. राणा दाम्पत्यांशी वादावेळी बच्चू कडू यांनी यासाठीच नमते घेतल्याचे मानले जाते.