नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास (ना सुप्र) च्या जमिनीवर वसलेल्या झोपडपट्ट्यामध्ये राहणाऱ्या लोकांवर कारवाई करून नासुप्रचे अधिकारी बिल्डरांच्या घशात जमिनी घालत आहे. बिल्डर, राजकारणी यांच्याशी हात मिळवणी करून नासुप्रचे अधिकारी भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप करीत मनसेच्या सैनिकांनी नागपूर सुधार प्रण्यासच्या अधिकऱ्याचा बडग्या बनवून बुधवारी सुधार प्रन्यासवर मोर्चा नेला.
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलकांनी नासुप्रच्या अधिकाऱ्याकडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात शिष्ट मंडळाने सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांची भेट घेऊन अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिले. दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.