केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरातील जागतिक पातळीवरील फाऊंटन वॉटर शोचे उद्घाटन करण्यात आले. या शोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी गडकरींनी ज्या लोकांनी आज शो पाहिला आहे, त्यांनी पुन्हा येऊ नये असे आवाहन केले आहे.
नागपुरातील फुटाळा तलावावर हा शो उभारण्यात आला आहे. येथे मोठे रेस्टॉरंट होणार आहे. फुडमॉल होणार आहे. लोकांना कमी किंमतीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच या ठिकाणी दहाव्या मजल्यावर चार मल्टीप्लेक्स देखील होणार आहेत. मागच्या बाजुला ७०० गाड्यांचे पार्किंग थेट पर्यटक शो पहायला येतील. स्वर्गिय लता मंगेशकर यांचे नाव दिले जाणार आहे, असे गडकरी म्हणाले.
फाऊंटनच्या बाजुला १०००० स्क्वे. फुचाचा प्लॅटफॉर्म उभारला जाणार आहे. साधारण ३००० लोक वरती आणि २००० लोक खाली खुर्च्यांवर बसू शकतील असे असेल. मागची इमारत ११ मजल्यांची असेल. त्यात ११०० गाड्यांचे पार्किंग होईल. सोलार रुफटॉप रेस्टॉरंट उभारले जाणार आहे.
जागतीक दर्जाचे फ्ल़ॉवर गार्डन देखील होणार आहे. बॉटनिकल गार्डनही होणार आहे. लोटस गार्डन बनविणार आहे. सुमारे ९५० प्रजाती असणार. फाऊंटनचे आर्किटेक्ट फ्रान्सचे आहेत. पंप तुर्कीचे आहेत. ए आर रेहमान यांचे संगीत आहे. बच्चन यांचा आवाज आणि मराठीत नाना पाटेकरांचा आवाज असणार आहे. फाऊंटनचे काम नागपूरच्य़ाच कंत्राटदाराने केले आहे, असे गडकरी म्हणाले.
एकदा शो पाहिला त्यांनी पुन्हा येऊ नये. गर्दी एवढी झालेली की कंट्रोल होणार नाही. शो बंद करावा लागेल. सहकार्य करावे. थंडी पडायला सुरुवात होईल यामुळे सात ऐवजी साडे सहाला शो ठेवावा. तीन शो ठेवावेत, अशी विनंती गडकरी यांनी केली.
भारतात पाहिला नाही असा शो...मी असा शो आजपर्यंत कधी भारतात पाहिलेला नाही, भारता बाहेरच पाहिला आहे. गडकरी सारे वरूनच करतात. कारंजा वर जातो, फ्लायओव्हर वर जातो. दोघांचेही मन जुळण्याचे कारण म्हणजे भव्यदिव्य, आमचे विचार भव्य. मी नागपूरला का यावे, आणखी एक कारण मिळाले. संत्रा नगरी आणि आता कारंजा नगरी. जे पाहिले ते बाथरुममध्येच कारंजे पाहिलेत. देशातील लोक हा शो पाहण्यासाठी येतील. त्याच्यासाठीची बांधणी होणे गरजेचे, असे राज ठाकरे म्हणाले.