शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

जागतिक ऑटिझम दिन; मोबाईल देतोय ‘आॅटिझम’ला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 9:46 AM

कोवळ्या वयात म्हणजे दोन वर्षाच्या आतील मुलांच्या हातात मोबाईल आल्याने ‘आॅटिझम’ (स्वमग्नता) हा आजार होण्याचा धोका वाढला आहे. १०० बालकांमध्ये साधारण ५ टक्के हा आजार दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांखालील मुले होत आहेत प्रभावित शंभरात पाच टक्के प्रमाण

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोबाईलच्या अतिरेकाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. पाळण्यात रडणाऱ्या पोराला शांत करण्यासाठी थेट हातात मोबाईल दिला जातो किंवा मुलांनी रडून रडून त्रास देऊ नये फक्त ती शांत बसावीत म्हणूनही मोबाईल दिला जातो. परिणामी, कोवळ्या वयात म्हणजे दोन वर्षाच्या आतील मुलांच्या हातात मोबाईल आल्याने ‘आॅटिझम’ (स्वमग्नता) हा आजार होण्याचा धोका वाढला आहे. १०० बालकांमध्ये साधारण ५ टक्के हा आजार दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लोकसंख्येच्या तुलनेत १५ टक्के आॅटिझमचे रुग्ण आढळून येतात. याविषयी अधिक माहिती देताना आॅक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. अश्विनी हजारे म्हणाल्या, लहान मुलांमध्ये आॅटिझम हा आजार मोठ्या प्रमाणात बळावत आहे. हा एक मानसिक आजार आहे. अशा मुलांचा विकास सामान्य मुलांप्रमाणे होत नाही, काही मुले आक्रमक तर काही मुले भित्रीही असतात. आॅटिझमची लक्षणे शक्यतो पालकांच्या लक्षात येत नाहीत. वयाच्या तिसऱ्या वर्षी ही लक्षणे मुलांमध्ये दिसू लागतात. तीन वर्षांनंतर मूल अचानक बोलायचे थांबते. कानाची तपासणी केली तरी त्यात दोष आढळत नाही. या काळात मूल बोलत नाही, आपल्या गरजा सांगत नाही. आंघोळ, जेवण यालाही प्रतिकार करायला लागते. दैनंदिन कार्यक्रम थोडा जरी बदलला तरी त्यांना राग येतो. काही मुले त्यातून बरीच हिंसकही होतात. प्रत्येक मुलातील लक्षणे वेगवेगळी असतात. यामुळे त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देणे गरजेचे असते. ‘आॅटिझम’वर औषधे नाही, परंतु विविध थेरपीमुळे त्यांना बरीच मदत होते.

केवळ १ टक्काच ‘आॅटिझम’मुले योग्य शाळेतउपराजधानीत साधारण ‘आॅटिझम’ची सहा हजारावर मुले आहेत. काही सामाजिक संस्थांनी आॅटिझमग्रस्त मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी वेगळ्या शाळा आता उपलब्ध झाल्या आहेत. अशा शाळांमधून त्यांना वेगळ्या पद्धतीने शिकविले जाते. पण अजूनही या शाळांमध्ये मुलाला पाठविणे पालक कमीपणाचे समजतात, परिणामी केवळ एक टक्का मुले शिक्षण घेत असल्याचे वास्तव आहे. उर्वरित हजारो विद्यार्थ्यांचे काय, योग्य शाळांअभावी त्यांची कुचंबणा होत आहे.

दोन ते पाच वर्षापर्यंत केवळ अर्ध्या तासासाठीच मोबाईलचा वापरआॅटिझम’ची लक्षणे आढळून आलेल्या दोन वर्षाच्या आतील मुलांच्या हाती मोबाईल देणे बंद केल्यास, त्यांच्यासोबत खेळल्यास, संवाद साधल्यास त्याच्यामध्ये प्रचंड बदल दिसून आले. दोन ते पाच वर्षाच्या आतील मुलांच्या हातात मोबाईल द्यायचेच असेल तर त्यात काय पाहावे, याची माहिती द्यावी. त्याचा अर्थ सांगावा आणि अर्ध्या तासाच्यावर ते मोबाईल पाहणार नाही, याचीही काळजीही घ्यावी.-डॉ. अश्विनी हजारे

मोबाईलमुळे समस्या वाढतच आहेडॉ. हजारे म्हणाल्या, अयोग्य जीवनशैली, मानसिक स्थिती, वाढता ताण, उशिरा प्रसूती, प्रसूतीमध्ये गुंतागुंत यामुळे मुलांमध्ये ‘आॅटिझम’चा आजार होऊ शकतो. अलीकडच्या काळात दोन वर्षाच्या आतील मुलाच्या हातात मोबाईल दिला जात असल्याने किंवा टीव्हीसमोर त्यांना बसवून ठेवले जात असल्याने काहींमध्ये ‘आॅटिझम’ची लक्षणे दिसून आली. मोबाईलमुळे लहान मुलांमधील समस्या वाढत असल्याचे निरीक्षणातून समोर आले आहे.

हे करा...

  • योग्य जीवनशैली आत्मसात करा
  • मुलांच्या हाती ‘गॅझेट’ देण्याऐवजी त्याच्याशी खेळा
  • त्याच्याशी संवाद वाढवा
  • प्रत्येक गोष्ट समजावून सांगा
  • उद्यानात घेऊन जा, त्यांच्याशी खेळा
  • आई-वडिलांनी आपल्या व्यस्ततेतून किमान एक तासाचा वेळ बाळासाठी काढा
टॅग्स :Healthआरोग्य