शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
7
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
8
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
9
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
10
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
11
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
12
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
13
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
14
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
15
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
16
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
17
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
18
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
19
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
20
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'

रेल्वेस्थानकावर मोबाईल चोरटे सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:07 AM

नागपूर : रेल्वेगाड्या ९० टक्के सुरू झाल्या आहेत. प्रवाशांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावर मोबाईल चोरटे सक्रिय झाले आहेत. ...

नागपूर : रेल्वेगाड्या ९० टक्के सुरू झाल्या आहेत. प्रवाशांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावर मोबाईल चोरटे सक्रिय झाले आहेत. आरक्षण कार्यालयात लोहमार्ग पोलीस ड्युटी करत नसल्यामुळे मोबाईल चोरटे प्रवाशांचे मोबाईल पळवित असल्याची स्थिती आहे.

शनिवारी रात्री विरजी ओमदयाल प्रजापती (२२, रा. गाजी जि. अलवर, जयपूर, राजस्थान) हे रेल्वेगाडीला वेळ असल्यामुळे आरक्षण कार्यालयात झोपले होते. त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने त्यांच्या खिशातील १३५०० रुपये किमतीचा मोबाईल आणि रोख ७५० रुपये काढले. झोपेतून जागे झाल्यानंतर त्यांना मोबाईल, पैसे चोरीला गेल्याचे समजले. लगेच त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तर रविवारी सलग दुसऱ्या दिवशी आरक्षण कार्यालयात सैन्य भरतीसाठी आलेला प्रभात मंजी पांडे (१९) हा युवक गाडीला वेळ असल्यामुळे दुपारी १२ वाजता झोपी गेला होता. अज्ञात चोरट्याने त्याच्या झोपेचा फायदा घेऊन त्याचा १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल पळविला. दोन्ही प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरक्षण कार्यालय तसेच प्लॅटफॉर्मवर लोहमार्ग पोलीस ड्युटी करीत नाहीत. याचा फायदा चोरटे घेऊन प्रवाशांचे मोबाईल, पाकिट, महागडे साहित्य पळवितात. त्यामुळे लोहमार्ग पोलीस सक्रिय झाल्यास चोरट्यांचा बंदोबस्त होईल. त्यासाठी नवनियुक्त महिला पोलीस निरीक्षकांनी यात लक्ष घालून आरक्षण कार्यालय, प्लॅटफॉर्मवर पोलिसांना कर्तव्य बजावण्याची तंबी देण्याची गरज आहे.

..............