बेला : परिसरात माेबाइल टाॅवरचे विविध साहित्य चाेरीला जाण्याचे प्रमाण वाढत असताना बेला (ता. उमरेड) पाेलिसांनी चाैघांना अटक केली व त्यांच्याकडून वाहन व चाेरीचे साहित्य जप्त केले. ही कारवाई साेनेगाव (लाेधी)-उमरेड राेडवरील कळमना फाटा परिसरात रविवारी (दि. १९) करण्यात आली.
माेहम्मद जावेद चांद खान (३२, खरबी चाैक, नागपूर), सूर्यप्रकाश ईश्वरीप्रसाद गाैतम (२४, रा. धनगवळीनगर, नागपूर), शहीद अजगर खान (५२, रा. खरबी चाैक, नागपूर) व माेहम्मद शहजाद माेहम्मद अजगर (३२, रा. खरबी चाैक, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे असून, ते मूळचे उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील रहिवासी आहेत. ते माेबाइल टाॅवरच्या कामासाठी नागपुरात आले असून, शहरात किरायाने राहतात. मध्यंतरी बेला परिसरात माेबाइल टाॅवरचे साहित्य चाेरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याने पाेलीस चाेरट्यांचा शाेध घेत हाेते.
दरम्यान, काही जण चाेरीचे साहित्य घेऊन साेनेगाव (लाेधी)हून उमरेडच्या दिशेने जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी या मार्गावरील कळमना फाटा परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. यात त्यांनी एमएच-४९/एटी-४९३१ क्रमांकाचा मेटॅडाेर थांबवून झडती घेतली. त्या वाहनात माेबाइल टाॅवरचे साहित्य आढळून येताच पाेलिसांनी कसून चाैकशी करायला सुरुवात केली. तेव्हा ते साहित्य चिमणझरी शिवारातील बीएसएनएलच्या माेबाइल टाॅवरचे असल्याचे तसेच ते चाेरून आणल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. त्यामुळे चाैघांनाही ताब्यात घेत अटक करण्यात आली.
त्यांच्याकडून एमएच-४९/एटी-४९३१ क्रमांकाचा मेटॅडाेर, २५ हजार रुपये किमतीचे लाेखंडी साहित्य, २५ हजार रुपये किमतीचे माेबाइल फाेन असा एकूण ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार पंकज वाघाेडे यांनी दिली असून, या चाेरट्यांकडून चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. याप्रकरणी बेला पाेलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार श्याम मरसकाेल्हे व शिपाई सतेंद्र रंगारी करीत आहेत.