लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळेच्या इमारतीवर मोबाईल टॉवर उभारून शाळेचे संचालक विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहे. टॉवरचे दुष्यपरिणाम सर्वश्रुत असतानाही, शिक्षण विभागाचेही याकडे दुर्लक्ष आहे.हुडकेश्वर रोडवर साकेत कॉन्व्हेंट स्कूलच्या इमारतीवर एक भलेमोठे मोबाईल टॉवर लावण्यात आले आहे. या माध्यमातून शाळेचे संचालक उत्पन्न मिळवित आहे. मात्र या टॉवरचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांवर काय होऊ शकतात, याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. विशेष म्हणजे शिक्षण हक्क कायदे २००९ च्या कलम ९ मध्ये शालेय इमारतीची देखभाल करणे व शालेय इमारतीचा परिसर फक्त शाळेसाठी वापरला जातो की नाही याचे परीक्षण करणे, असा स्पष्ट उल्लेख आहे. पण साकेत कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शाळेच्या इमारतीचा वापर उत्पन्न मिळविण्यासाठी करण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना धोकादायक ठरेल, अशी यंत्रणा शाळेच्या इमारतीवर उभी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांनी शाळांना भेटी देणे आवश्यक आहे. पण या अधिकाऱ्यांनाही कधी टॉवरच्या बाबतीत गांभीर्य लक्षात आले नाही. टॉवरच्या परिणामाबद्दल कुणालाच जनजागृती नसल्याने संचालकांची मनमानी सुरू आहे. मोबाईल टॉवर स्लो पॉयझनमोबाईलचे टॉवर ज्या ठिकाणी उभे राहते त्याच्या ३०० ते ४०० मीटर अंतरावर ७ ते ८ हजार मायक्रोव्हॅटचे रेडिएशन पसरते. त्याचे दुष्परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतात. गर्भवती महिलांवर त्याचा परिणाम होतो. डोके दुखणे, अशक्तपणा, चिडचिड या समस्या संशोधनातून अनुभवायला आल्या आहेत. मोबाईल टॉवर हे स्लो पॉयझन आहे. ४ ते ५ वर्ष सातत्याने टॉवरच्या संपर्कात राहिल्यास ब्रेनट्युमर, ब्रेनकॅन्सर सारखे दुर्धर आजार होऊ शकतात.गौरव सव्वालाखे, रेडिएशन एक्स्पर्ट
नागपुरात शाळेवर उभारले मोबाईल टॉवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:40 PM
शाळेच्या इमारतीवर मोबाईल टॉवर उभारून शाळेचे संचालक विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहे. टॉवरचे दुष्यपरिणाम सर्वश्रुत असतानाही, शिक्षण विभागाचेही याकडे दुर्लक्ष आहे.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ : शिक्षण विभागाचेही दुर्लक्ष