शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉटविक्री करणाऱ्या टोळीवर मकोका

By योगेश पांडे | Published: March 13, 2024 10:57 PM

मुख्य सूत्रधारासोबत १८ जणांना आरोपी बनविण्यात आले आहे.

नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींच्या प्लॉट्सची विक्री करणाऱ्या टोळीवर नागपूर पोलिसांनी मकोकाअंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधारासोबत १८ जणांना आरोपी बनविण्यात आले आहे.

प्रवीण मोरेश्वर सहारे (४६, गोधनी) हा या टोळीचा सूत्रधार आहे. त्याच्यासोबत इमाम खान अब्दुल रहीम खान (३३, बेसा बेलतरोडी), पवनकुमार कालकाप्रसाद जंगेला (३४, मनिष नगर), नारायण वर्मा (४०, सिवनी, मध्यप्रदेश), प्रतिभा विलास मेश्राम (४६, उमरेड), विजय उईके. कौशल संजय हिवंज (२२, परसोडी वर्धा रोड), अथर्व श्रीकृष्ण भाग्यवंत (२२, गोपालनगर), भुपेश कवडुजी शिंदे (४०, शंकरपुर बेलतरोडी), साहील बिलाल शेख (२३, भामटी रोड, सुजाता ले आउट), कार्तीक उर्फ रजत शिवराम लोणारे (३०, मेहंदीबाग रोड, शांतीनगर), सिध्दार्थ वासुदेव चव्हाण (४०, स्नेहदिप काॅलोनी, जरीपटका), मोहम्मद रियाज उर्फ बबलु अब्दुल रौफ (५४, कसाबपुरा, मोमीनपुरा), नासीर हसन खान (४३, स्वागत नगर, गिट्टीखदान), इमरान अली अख्तर अली (४३, संजय बाग काॅलोनी, यशोधरानगर) व रुपेश अरुण वारजुरकर (३४,महात्मा फुले नगर, अजनी), मोहित मेहमूद अली (३२, कोराडी मार्ग) तसेच इरशाद अहमद निसार अहमद (४५,मोमिनपुरा) अशी आरोपींची नावे आहेत.

निशा राजकुमार जाजू यांनी मौजा नारा येथे १९९२ साली तीन हजार चौरस फुटांचा प्लॉट खरेदी केला होता. या टोळीने खोटी महिला उभी करून इमाम खान अब्दुल रहीम खान (३३) याला पाच लाखात प्लॉटची विक्री केली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. बनावट महिलेच्या बॅक खात्यातून प्रवीण सहारे हा आरोपी पैसे काढण्यासाठी आला असता त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर विक्रीपत्रात साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करणारे पवनकुमार जंदेला, कौशल हिवंज, अथर्व भाग्यवंत यांना अटक करण्यात आली होती. सहारेच्या मोबाईलचा तपास केला असता टोळीची माहिती समोर आली होती.सह दुयम निबंधक याच्या कार्यालयात काम करणारा कार्तीक उर्फ रजत लोणारे यास ताब्यात घेवुन त्यास विचारपुस केली असता तो दुयम निबंधक कार्यालयातून त्याच्या ओळखीचा सिद्धार्थ चव्हाण याला रेकॉर्डमधून कागदपत्रे पुरवित असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर कार्तीक उर्फ रजत लोणारे व सिध्दार्थ चव्हाण यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी इमरान अली या आरोपीच्या वाहनाची झडती घेतली असता त्यात अनेक बनावट नोटा व बोगस कागदपत्रे आढळून आली. या नोटा त्याने मोहम्मद रियाझ याच्याकडून घेतल्या होत्या. या टोळीने अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याची बाब समोर आली. सहारे आणि त्याच्या साथीदारांच्या अटकेनंतर अनेक तथ्य समोर आले. त्याआधारे पोलिसांनी मकोका कारवाई केली आहे.

टोळीने अनेकांना गंडविले

या टोळीने शहरातील मोकळे भूखंड शोधून एनआयटी आणि दुय्यम सब रजिस्ट्रार कार्यालयातून जमिनीची कागदपत्रे मिळविली. प्लॉट मालकाच्या नावे बनावट आधार-पॅन कार्ड व इतर कागदपत्रे तयार केली. प्लॉटधारकाच्या जागी डमी महिला किंवा पुरुष उपस्थित करून प्लॉटची खरेदी-विक्री केली. त्यानंतर संबंधित भूखंडावर बँकेकडून कर्ज घेतले. ज्या व्यक्तीच्या नावावर कर्जाची रक्कम जारी केली जाते त्याच्या नावावर डमी खातेदेखील उघडले. या टोळीने धंतोली येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये डमी खाते उघडून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. सदर, पाचपावली, गिट्टीखदानासह अनेक पोलीस ठाण्यांमध्ये या टोळीने फसवणुकीचे प्रकार केले आहेत. 

टॅग्स :nagpurनागपूर