शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

मॉडेल मिल चाळवासीयांचा विरोध पडला अतिक्रमण पथकावर भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 10:18 PM

गणेशपेठच्या मॉडेल मिल चाळीतील जीर्ण झालेल्या इमारती तोडण्यासाठी मनपाचे पथक मंगळवारी दुपारी कारवाईसाठी पोहचले. मात्र चाळवासीयांनी दाखविलेल्या आक्रमकतेमुळे मनपाच्या अतिक्रमण पथकाला परत जावे लागले.

ठळक मुद्देचाळवासी हटण्यास तयार नाही : जीर्ण झालेल्या इमारतीचा नागरिकांना धोका

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : गणेशपेठच्या मॉडेल मिल चाळीतील जीर्ण झालेल्या इमारती तोडण्यासाठी मनपाचे पथक मंगळवारी दुपारी कारवाईसाठी पोहचले. मात्र चाळवासीयांनी दाखविलेल्या आक्रमकतेमुळे मनपाच्या अतिक्रमण पथकाला परत जावे लागले.स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, स्थानिक लोकांनी जमिनीवर घर मिळण्यासाठी न्यायालयीन लढाई लढली आहे. न्यायालयाने येथे निर्माण कार्य करणाऱ्या एजन्सीला प्रत्येक कुटुंबाला २२५ चौरस फुट घर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला आता १६ वर्ष झाले आहे. संबंधित एजन्सीने अजून सुरुवातही केली नाही. महापालिका मात्र चाळीतील जीर्ण झालेल्या इमारतीमुळे नागरिकांना धोका होऊ नये म्हणून ते तोडण्याचा आग्रह करीत आहे. मात्र येथील रहिवाशांचे म्हणणे आहे की, जीर्ण झालेला भाग आम्ही स्वत:च तोडला आहे. आम्हाला आमच्या सुरक्षेची काळजी आहे. मंगळवारी कुठलीही नोटीस न देता मनपाचे अतिक्रमण पथक कारवाईसाठी येथे पोहचले. मात्र त्याला नागरिकांनी प्रचंड विरोध केला. पथकाला पोलीस बंदोबस्त सुद्धा मिळाला नव्हता. त्यामुळे हे पथक कारवाई न करता परत गेले. चाळीत १७७ कुटुंबाचा निवासमॉडेल मिल चाळीमध्ये १७७ कुटुंब राहतात. येथे राहणारे कुटुंबीय स्वत:चे घर मिळावे म्हणून अनेक वर्षापासून न्यायालयीन लढाई लढत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही येथील लोकांना घर बांधून देण्यात आले नाही. त्यामुळे जीर्ण झालेल्या इमारतीत त्यांना राहण्याशिवाय पर्याय नाही. चाळवासीयांनी स्वत:च तोडावी घरेधंतोली झोनच्या सहा. आयुक्त स्मिता काळे म्हणाल्या की, मॉडेल मिल चाळीत २०१७ मध्ये घटना घडली होती. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. चाळवासीयांची पर्यायी निवास व्यवस्था होणे आवश्यक आहे. परंतु रहिवासी व बिल्डरमध्ये सामंजस्य झालेले नाही. चाळीतील इमारती अतिशय जीर्ण झालेल्या आहे. त्यामुळे रहिवाश्यांच्या जीवाला धोका आहे. नागरिकांच्या जीवाला धोका असल्यामुळे प्रशासनाची भूमिका अशा इमारती पाडण्यात येणे आवश्यक आहे. जर चाळवासी स्वत: इमारत तोडून नवीन घर बनवून राहण्यास तयार असले तर मनपाला कुठलीही आपत्ती नाही. मात्र तसे करीत नसतील तर आवश्यक पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणnagpurनागपूर