नागपूर : तामिळनाडू, केरळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या प्रणालीचा महाराष्ट्रावरही प्रभाव पडणार असून पुढील दोन दिवस ढगाळ वातावरणानंतर मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिराेलीसह राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये एकादशीला ढग दाटून पाैर्णिमेला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तामिळनाडू, केरळमध्ये सध्या ‘पूर्वी वारा झाेता’मुळे जाेरदार पाऊस पडत आहे. ही प्रणाली अरबी समुद्रात उतरून महाराष्ट्राच्या पश्चिम किणारपट्टीवर समांतर आगेकुच करीत गुजरातकडे जाणार आहे. या प्रभावातून २३ व २४ नाेव्हेंबरदरम्यान विदर्भासह महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यानंतर २५ ते २७ नाेव्हेंबरपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. काेकण, सिंधुदुर्ग, खांदेश, नाशिक, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काहीच जिल्हे या प्रभावात येणार आहेत. यात यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिराेली या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज असून नागपूरसह वर्धा, भंडारा, गाेंदिया, अमरावतीत पावसाची शक्यता नसल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. २८ नाेव्हेंबरपर्यंत पावसाळी वातावरण दूर हाेण्याचा अंदाज आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण हाेण्याचा अंदाज असून ते बांग्लादेशकडे कुच करेल, असा अंदाज आहे. मात्र याचा महाराष्ट्रावर कुठलाही प्रभाव हाेणार नसल्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले.
थंडी कमी झालीदरम्यान मंगळवारी अंशत: कमी झालेल्या रात्रीच्या तापमानात बुधवारी अंशत: वाढ झाली. नागपुरात किमान तापमान १६.८ अंश नाेंदविण्यात आले असून ते सरासरीपेक्षा २.३ अंशाने अधिक आहे. कमाल तापमानात अंशत: घट झाली असली तरी ते सरासरीपेक्षा अधिक आहे. इतर सर्व जिल्ह्यात दिवस-रात्रीचा पारा सरासरीच्या वर चढला आहे. तापमान वाढल्याचे थंडीचा प्रभावही कमी झाल्याचे दिसून येत आहे. केवळ मध्यरात्र ते पहाटे गारव्याचा अनुभव येत आहे.