लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सौर ऊर्जेच्या माध्यमातून एकीकडे मोठ्या प्रमाणात महामेट्रो विजेची बचत करीत असताना आता महामेट्रोेने वीज बचतीकरिता मोलाचे पाऊल उचलले आहे. याचाच एक भाग म्हणजे विजेची बचत करणारे ‘हाय व्हॉल्यूम लो-स्पीड’ (एचव्हीएलएस) पंखे सुरुवातीला महामेट्रोच्या खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ या तीन स्टेशनवरील प्लॅटफार्मवर बसविण्यात येणार आहे.पुढे या पंख्यांचा वापर मेट्रो स्टेशनच्या सर्वच प्लॅटफार्मवर होणार आहे. या पंख्याच्या संचालनाकरिता विजेचा वापर फारच कमी होणार असल्याने विजेची मोठ्या प्रमाणात बचत होईल. पंख्यांमध्ये आधुनिक डी.सी. (डायरेक्ट करंट) मोटरचा वापर होत असल्याने यात ‘गिअर बॉक्स’ची गरज पडत नाही. यामुळे आवाज तर कमी होतोच शिवाय विजेची बचतदेखील होते. पंख्याचा व्यास १० मीटर असून या एका पंख्यामुळे सुमारे २७०० चौरस फूट परिसरात याचा लाभ मिळतो.ऊर्जेची बचत करणारा पंखा कमाल १९० व्हॅट ऊर्जेचा वापर करतो. देखरेखीचा खर्च येत नाही; शिवाय पंख्यांच्या वापरामुळे त्या भागातील तापमान किमान ५ डिग्रीने कमी होते. अपघात परिस्थितीत आग लागल्यास ९० सेकंदात हे पंखे बंद होतात. या पंख्यांमुळे होणारी विजेची बचत, सुटसुटीत वापर आणि देखरेखकरिता कुठलाही खर्च होणार नसल्याने महामेट्रोने या पंख्याचा स्वीकार केला आहे.
मेट्रोचे आधुनिक पंखे करतील विजेची मोठी बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 11:17 PM
सौर ऊर्जेच्या माध्यमातून एकीकडे मोठ्या प्रमाणात महामेट्रो विजेची बचत करीत असताना आता महामेट्रोेने वीज बचतीकरिता मोलाचे पाऊल उचलले आहे. याचाच एक भाग म्हणजे विजेची बचत करणारे ‘हाय व्हॉल्यूम लो-स्पीड’ (एचव्हीएलएस) पंखे सुरुवातीला महामेट्रोच्या खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ या तीन स्टेशनवरील प्लॅटफार्मवर बसविण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे कमी ऊर्जेचा वापर : देखरेख खर्च शून्य