शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

इमामवाड्यातील फुले टोळीवर मोक्का

By admin | Published: March 07, 2016 2:44 AM

रामबाग, इमामवाड्यातील कुख्यात मयूर फुले आणि त्याच्या टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या(मोक्का)नुसार कारवाई केली आहे.

नागपूर : रामबाग, इमामवाड्यातील कुख्यात मयूर फुले आणि त्याच्या टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या(मोक्का)नुसार कारवाई केली आहे. मयूर सुरेश फुले (वय १८), त्याचा भाऊ हर्षद (रा. रामबाग), अमोल ताराचंद वाघमारे (वय १९), रितेश दीपक तायडे (वय १९), अभय विनोद कांबळे (वय १९), सूरज गोपाल पाटील, ऋतिक ऊर्फ काऱ्या विक्की खोब्रागडे (रा. रामबाग) आणि हिमांशु विश्वजित नांदगावे (वय २०, रा. भानखेडा मोमिनपुरा) अशी मोक्का लावलेल्या गुंडांची नावे आहेत.पारडीतील अनिल वंजारे याची १३ फेब्रुवारीला कुख्यात फुले टोळीने तलवार, चाकूचे घाव घालून निर्घृण हत्या केली होती. यापूर्वीही या गुडांनी खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ले, लुटमार, खंडणी वसुली, बलात्कार, विनयभंग असे अनेक गुन्हे केले असून, त्यांची या भागात प्रचंड दहशत आहे. इमामवाड्यातील जाटतरोडी, मेडिकल परिसरात रात्रीच्या वेळी महिला-मुलींना उचलून नेऊन बलात्कार करण्याचे प्रकार नेहमीच घडतात. त्यात फुले टोळीतील गुंडांचा सहभाग असल्याची कुजबूज आहे. बदनामी तसेच जीवाच्या धाकाने कुणी तक्रार करण्याचे धाडस दाखवत नाही. त्यामुळे आरोपी कमालीचे निर्ढावले आहेत. रामबाग इमामवाड्यात दहशत पसरविण्याच्या हेतूनेच फुले टोळीने वंजारेची हत्या केल्याचे तपासात उघड झाल्यामुळे या टोळीवर पोलिसांनी मोक्का लावला. विशेष म्हणजे, मोक्का लावण्यात आलेल्या आठ गुन्हेगारांतील तिघे १६ ते १७ वर्षे वयोगटातील (अल्पवयीन) आहेत. बलात्कार, खून, खंडणी वसुलीसारखे गंभीर गुन्हे करायचे आणि अल्पवयीन म्हणून पोलीस कारवाईपासून बचाव करायचा, अशी या गुन्हेगारांची क्लृप्ती आहे. (प्रतिनिधी)आठवी कारवाई शहरातील गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी पोलिसांनी केलेली मोक्काची ही आठवी कारवाई आहे. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त राजवर्धन सिन्हा, श्रीकांत तरवडे, उपायुक्त ईशू सिंधू, यांच्या निर्देशानुसार एसीपी एस. डी. राठोड तसेच इमामवाड्याचे ठाणेदार शेखर तावडे यांनी ही कारवाई केली.