लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोक्षधाम ते धंतोली ठाण्याच्या दरम्यान रेल्वे पुलाचे बुधवारी दुपारी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आल्याने जवळपास तासभर रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. पुलाखालची वाहतूक थांबविल्याने वाहनचालकांना त्रास होत होता. वाहतुकीचा जामसुद्धा लागला होता.मध्य रेल्वेने पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटची जबाबदारी व्हीएनआयटीला दिली आहे. व्हीएनआयटीच्या टीमने बुधवारी दुपारी १ वाजता पोहचून काम सुरू केले. तज्ज्ञांकडून पुलाची तपासणी करण्यात आली. त्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. शहर वाहतूक पोलिसांकडून ऑडिटचे काम होईपर्यंत वाहतूक थांबविण्याची परवानगी घेतली होती. पूर्वेकडून पश्चिमेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारी वाहतूक मोठ्या संख्येने याच मार्गावरून जात असल्याने वाहन चालकांना चांगलाच त्रास झाला. मोठ्या प्रमाणात काही काळ वाहतुकीचा खोळंबाही झाला होता. जवळपास तासभर हे काम सुरू होते.झाडांमुळे पुलाला भेगा पडत आहेतरेल्वे पुलाची क्षमता तपासण्यासाठी दुसऱ्या एजन्सीकडून ऑडिट करीत आहे. पण काही बाबतीत विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. पुलाच्या भिंतीवर वाढत असलेल्या झाडांमुळे भेगा पडत आहेत. या झाडांना तोडण्यासाठी मध्य रेल्वेच्या इंजिनीअरिंग ब्रँचचे लक्ष नाही. त्याचबरोबर पुलाच्या खालच्या बाजूस काही जागेतून कॉँक्रिट निघत असून लोखंडी सळाखी दिसत आहेत.
मोक्षधाम रेल्वे पूल गाठतोय शंभरी : रेल्वे पुलाचे केले स्ट्रक्चरल ऑडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 11:39 PM
मोक्षधाम ते धंतोली ठाण्याच्या दरम्यान रेल्वे पुलाचे बुधवारी दुपारी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आल्याने जवळपास तासभर रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. पुलाखालची वाहतूक थांबविल्याने वाहनचालकांना त्रास होत होता. वाहतुकीचा जामसुद्धा लागला होता.
ठळक मुद्देरेल्वे पुलाच्या ऑडिटमुळे लागतोय जाम