लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शॉर्ट फिल्ममध्ये काम करणाऱ्या कथित नटीने तिच्याकडून काम करवून घेणाऱ्या निर्मात्यावर (प्रोड्युसर) विनयभंगाचा आरोप लावला. तिच्या तक्रारीनुसार, मार्च २०१७ मध्ये सीताबर्डीतील सिनेमॅक्स मॉलमध्ये हा प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलीस या तक्रारीची चौकशी करीत आहेत. सोबतच नटीने विनयभंगाची तक्रार नोंदवण्यासाठी १४ महिने वाट का बघितली, त्याचाही पोलीस तपास करीत आहेत.तक्रार करणारी तरुणी (वय १८) मूळची पांढरकवडा येथील रहिवासी आहे. सधन कुटुंबातील ही तरुणी शिक्षणाच्या निमित्ताने नागपुरात राहते तर, कथित शॉर्ट फिल्मचा प्रोड्युसर रुमिल शर्मा (वय ३२) हा वर्धमाननगरला राहतो. गेल्या वर्षी एका म्युझिक अल्बम आणि शॉर्ट फिल्मच्या निमित्ताने तरुणीची आणि रुमिल शर्माची ओळख झाली. शर्माने बनविलेल्या एका शॉर्ट फिल्ममध्ये आणि दुसऱ्या एका म्युझिक अल्बममध्ये तिने काही सेकंदाची भूमिका केली. त्यानंतर ते नियमित संपर्कात होते. मार्च २०१७ मध्ये शर्माने तिला सीताबर्डीतील सिनेमॅक्स मॉल तसेच कॅफे कॉफी डे येथे बोलविले. तेथे चर्चा करताना शर्माने तिच्यासोबत लज्जास्पद कृत्य केले. त्यानंतर तरुणी आपल्या वाहनाने घरी जात असताना मागे बसलेल्या आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन केले. तिने विरोध केला असता आरोपीने शिवीगाळ केल्याचेही तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे. ठाणेदार हेमंत खराबे यांनी याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा नोंदविला. मात्र, ही तक्रार नोंदविण्यास चक्क १४ महिने विलंब का झाला, असा प्रश्न पोलिसांना पडला असून, पोलीस त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी दुसऱ्या पैलूंचीही चौकशी करीत आहेत.पांढरकवड्यातही गुन्हापोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, या नटीने शर्मावर मोठी रक्कम मागितल्याचाही आरोप केल्याची माहिती आहे. तिच्या तक्रारीवरून फेब्रुवारी २०१८ मध्ये पांढरकवडा पोलिसांनी शर्माविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे सांगितले जाते. या दोन्ही तक्रारींमुळे हे प्रकरण अधिकच नाट्यमय बनले असून, पोलीस या प्रकरणाची विस्तृत चौकशी करीत आहेत.
नागपुरात नटीचा विनयभंग, निर्मात्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 1:18 AM
शॉर्ट फिल्ममध्ये काम करणाऱ्या कथित नटीने तिच्याकडून काम करवून घेणाऱ्या निर्मात्यावर (प्रोड्युसर) विनयभंगाचा आरोप लावला. तिच्या तक्रारीनुसार, मार्च २०१७ मध्ये सीताबर्डीतील सिनेमॅक्स मॉलमध्ये हा प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
ठळक मुद्दे१४ महिन्यानंतर तक्रार : सीताबर्डीत निर्मात्यावर गुन्हा दाखल