लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (नरखेड) : शाळेतील शिपायाने इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलोना (ता. नरखेड) येथील मातोश्री सुमनताई आदिवासी आश्रमशाळेत दोन महिन्यांपूर्वी घडली होती.पीडित विद्यार्थिनी महाशिवरात्रीनिमित्त गावी गेली असता, तिने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला आणि पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.अशोक शांताराम चरडे (३९, रा. वॉर्ड क्रमांक २, नरखेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो बेलोना येथील मातोश्री सुमनताई आदिवासी आश्रमशाळेत शिपाईपदी नोकरी करतो. ही शाळा वर्धा येथील श्रीकृष्ण शिक्षण संस्थेच्यावतीने चालविण्यात येते. त्याने याच शाळेतील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थिनीचा डिसेंबर २०१८ च्या पहिल्या आठवड्यात विनयभंग केला. शिवाय, या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नये म्हणून तो तिला सतत धमकावतही होता.सध्या महाशिवरात्रीनिमित्त शाळेला सुटी असल्याने ती गावी (पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) गेली होती. ती सतत उदास राहात असल्याने वडिलांनी तिला विचारणा केली. त्यामुळे तिने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. त्यांनी तिला विश्वासात घेत लगेच नरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि ३५४, ३७६ व पोक्सो अन्वये गुनहा नोंदवून आरोपी अशोक चरडे याला अटक केली. त्याला नरखेड येथील प्रथमश्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला न्यायालयील कोठडी सुनावल्याने त्याची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.घडलेला हा प्रकार दोन महिन्यांपूर्वीचा आहे. ती सुट्यांमध्ये नुकतीच गावी गेली आणि घडलेल्या प्रकाराची माहिती वडिलांना दिली. तिच्या तक्रारीवरून आरोपी अशोक चरडे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४ , ३७६ आणि पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. तिच्यावर अतिप्रसंग झाला नाही. ती अल्पवयीन असल्याने उच्च न्यायालयाने अतिप्रसंगाच्या केलेल्या नवीन व्याख्येनुसार आरोपीविरुद्ध भादंवि ३७६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.- विक्रम कदमएसडीपीओ, काटोल.पीडित विद्यार्थिनीने यासंदर्भात ७ डिसेंबर २०१८ रोजी शिक्षिकेकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत शाळेच्या अधीक्षकाने अशोक चरडे याला पत्र देऊन या प्रकाराबाबत विचारणा केली होती. त्यावर मुलगी आपल्याला फसविण्याचा प्रकार करीत असल्याचे त्याने उत्तर दिले होते. मात्र, आपण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संस्थेकडे त्याच्या निलंबनाची शिफारस केली होती. आजारी असल्याचे कारण सांगून तो १४ डिसेंबर २०१८ पासून शाळेत आला नाही.- नंदकिशोर बासेवार, मुख्याध्यापक,मातोश्री सुमनताई आदिवासी आश्रमशाळा, बेलोना.
नागपूर जिल्ह्यातील बेलोन्याच्या आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 7:06 PM
शाळेतील शिपायाने इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलोना (ता. नरखेड) येथील मातोश्री सुमनताई आदिवासी आश्रमशाळेत दोन महिन्यांपूर्वी घडली होती.पीडित विद्यार्थिनी महाशिवरात्रीनिमित्त गावी गेली असता, तिने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला आणि पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
ठळक मुद्देआरोपी शिपायास अटक