शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनयभंग; लग्नासाठी आग्रह करीत मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2022 4:22 PM

आठ महिन्यांपूर्वी नातेवाइकाने काही कामानिमित्त आरोपीच्या मोबाईलवरून तरुणीला आधार कार्ड पाठविले होते. त्यामुळे आरोपीकडे तरुणीचा मोबाईल क्रमांक होता. यावरून तो तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता.

भिवापूर(नागपूर) : मोबाईल नंबरच्या आधारे झालेल्या ओळखीतून तरुणाने एकतर्फी प्रेम व्यक्त करीत तरुणीच्या घरात शिरत तिचा विनयभंग केला. एवढेच काय, तर लग्नासाठी आग्रह करीत तिला मारहाणही केली. सदर घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास स्थानिक सिद्धार्थनगर येथे घडली. आरोपी व फिर्यादी तरुणी चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांतील रहिवासी आहेत.

राकेश रामाजी चहांदे (३५, रा. नवरगाव, ता. सिंदेवाही) तर तरुणी ही चिमूर तालुक्यातील रहिवासी असून सध्या ती भिवापूर येथील नर्सिंग कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे स्थानिक सिद्धार्थनगर परिसरात भाड्याच्या घरात वास्तव्यास आहे. प्राप्त माहितीनुसार तरुणीचा एक नातेवाईक हा आरोपीच्या घराशेजारी राहतो.

आठ महिन्यांपूर्वी नातेवाइकाने काही कामानिमित्त आरोपीच्या मोबाईलवरून तरुणीला आधार कार्ड पाठविले होते. त्यामुळे आरोपीकडे तरुणीचा मोबाईल क्रमांक होता. यावरून तो तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र तरुणी त्याला प्रतिसाद देत नव्हती. अशातच आरोपीने गुरुवारी सकाळच्या सुमारास भिवापूर गाठले. तरुणीच्या घरात शिरून तिचा विनयभंग केला. शिवाय लग्नासाठी आग्रह करीत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता तिला मारहाणसुद्धा केली. आरडाओरड पाहून घरमालकाने धाव घेत तरुणीची सोडवणूक केली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात दुर्गा शंभरकर तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगnagpurनागपूर