सावनेर : साेशल मीडियावरून मेसेज पाठवून संशयित आराेपीने तरुणीचा विनयभंग केला. शिवाय आराेपीने तिला लग्न ताेडण्याची धमकी दिली. दरम्यान पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे. ही घटना सावनेर शहरात रविवारी (दि.२) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
प्रतीक माेरेश्वर डाखाेळे (३०, रा. बाजार चाैक, सावनेर) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. १५ एप्रिलदरम्यान आराेपीने २५ वर्षीय तरुणीशी ओळखत नसताना प्रपाेज केले. त्यानंतर आराेपी तिला फेसबुक मॅसेंजरवरून रिक्वेस्ट पाठवून मेसेज पाठवून लागला. तसेच बॅंकेपासून घरापर्यंत तिचा पाठलाग केला. दरम्यान, रविवारी (दि.२) आराेपीने तरुणीला मेसेज करून तिचे लग्न ताेडण्याची धमकी दिली. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून सावनेर पाेलिसांनी भादंवि कलम ३५४, ३५४ (ड), ५०७ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपीला अटक केली आहे. पुढील तपास महिला सहायक पाेलीस निरीक्षक रासकर करीत आहेत.