लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात अनेकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यातूनच मग आरोग्याचे प्रश्न सुरू होतात. हृदयरोग हा यातूनच उद्भवतो. हृदयविकारात रागावर नियंत्रण मिळविणे आवश्यक असते. विशेषत: क्षणोक्षणी राग येणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरते. या रागाचा व हृदयघाताचा घनिष्ट संबंध येतो, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शिशीर पळसापुरे यांनी दिली.कार्डिओलॉजी सोसायटी आॅफ इंडिया आणि पीस फाऊंडेशन यांच्यावतीने निरोगी जीवनशैली, हृदय या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राष्टÑसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र- कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, हृदयरोग तज्ज्ञडॉ. अजीज खान, गार्डन क्लबचे सचिव शरद पालीवाल उपस्थित होते.डॉ. पळसापुरे म्हणाले, सकारात्मक विचार केल्यास तणाव कमी होतो. यामुळे आपल्या विचारात बदल करणे आवश्यक आहे. हृदय निरोगी राहण्यास मदत होईल. शरद पालीवाल म्हणाले, तणाव आणि हृदयघाताच्या रुग्णांसाठी ‘गार्डनिंग’ हा एक चांगला उपाय आहे. यामुळे आपल्याला आॅक्सिजन मिळतो, उत्साहही वाढतो.डॉ. अजीज खान म्हणाले, अनेकवेळा हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे एकदम दिसत नाही. तणाव, वय, काही आजार आणि वांशिक पद्धतीनेही हृदय विकाराचा झटका येतो. भारतात ६० टक्के लोकांचा मृत्यू हा पहिल्या एका तासात योग्य उपचार न मिळाल्यामुळे होतो. यामुळे नियमित आरोग्य तपासणी, धूम्रपानावर बंदी, व्यायाम हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. डॉ. प्रमोद येवले म्हणाले, ताण हा पालकांच्या संस्कारावर अवलंबून आहे. आपण मुलांवर अपेक्षांचे ओझे लादतो त्यामुळे त्यांना ताण येतो. आपले आयुष्य अनमोल आहे. ते कसे जगायचे याचा आपणच विचार करायला हवा.प्रास्ताविक डॉ. राम घोडेस्वार यांनी केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. यावेळी ‘दिल से दिल तक’ या सदरात डॉ. शंकर खोब्रागडे, डॉ. प्रशांत जगताप, डॉ. प्रमोद मुंधडा व जयश्री पेंढारकर यांनी मार्गदर्शन केले.
क्षणोक्षणी रोग येणे हृदयासाठी घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 1:13 AM
धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात अनेकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यातूनच मग आरोग्याचे प्रश्न सुरू होतात.
ठळक मुद्देशिशिर पळसापुरे यांची माहिती : ‘निरोगी हृदय’ विषयावर चर्चासत्र