एक, दोन, पाच, दहाची सुटी नाणी पर्समध्ये अथवा खिशात बाळगणे कठीण झाले आहे. अनेक दुकानदार नाणी स्वीकारत नाहीत. सर्वच बाजारपेठांमध्ये डिजिटल पेमेंटला चालना मिळाली आहे. त्यामुळे दहाचे नाणे सहजासहजी कुणी स्वीकारत नाहीत. त्यामुळे बँकांनी आता दहाचे नाणे चलनातून रद्द करावे.
विठ्ठल चलपे, नागरिक.
भाजीपाला किंवा किरकोळ दुकानदार दहा रुपयांची नाणी स्वीकारत नसल्याचे अनेकदा दिसून येते. त्यामुळे कुणीही जर दहा रुपयांचे नाणे देत असेल तर घेण्यास मागे-पुढे पाहतो. दुकानदारही डिजिटल पेमेंटमुळे नाणे स्वीकारत नाहीत. त्यामुळे पैसा असून अडचण, अशी स्थिती होते. त्यामुळे चलनात नाणे ठेवू नयेच.
पृथ्वी सातपुते, नागरिक.
रिझर्व्ह बँकेकडून चलनात असलेले दहा रुपयांचे नाणे बंद झालेले नाही. याबाबत अनेकदा जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज न बाळगता दहा रुपयांच्या नाण्याचा व्यवहारात वापर करावा. बँकेतसुद्धा दहा रुपयांची नाणी स्वीकारली जातात. डिजिटल पेमेंटमुळे आणि वजनात जड असल्यामुळे लोक स्वीकारण्यास टाळतात. बँकांमध्ये नाण्यांचा साठा आहे.
मकरंद फडणीस, वरिष्ठ व्यवस्थापक, युनियन बँक.