लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाटीलकीचा वारसा असणारा तिरळे कुणबीसमाजसमाजातील आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी मुलांच्या लग्न सोहळ्यावर लाखो रुपये खर्च करतो. यासाठी प्रसंगी कर्जबाजारी होतो. शेती विकतो. आर्थिक विवंचनेतून पुढे आत्महत्या होतात. काळाजी गरज लक्षात घेता लग्न सोहळ्यावर होणारा भरमसाट खर्च वाचवून तो मुलांच्या शिक्षणावर, त्यांचे जीवन संपन्न करण्यासाठी खर्च करावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.तिरळे कुणबी सेवा मंडळ नागपूरतर्फे न्यू चोपडे लॉन्स, पोलीस लाईन टाकळी येथे सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात चार जोडपी विवाहबद्ध झाली. मंडळातर्फे पाटीलकीच्या थाटात लग्न करण्यात आले. उत्तम डेकोरेशन, स्वादिष्ट भोजनासह घोडा, बॅण्ड, रोषणाई, आतषबाजीची व्यवस्था करण्यात आली. पाहुण्यांचा मानपान करण्यात आला. सोहळ्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. सुधाकरराव देशमुख, महापौर नंदा जिचकार, प्रभाकरराव भुसारी महाराज, ज्योती बावनकुळे, सुनीता गावंडे, वैशाली चोपडे, नागोराव साबळे, किशोर वानखेडे, संगीता गिºहे, साधना बरडे, सरपंच वर्षा कोडे, भावना चांभारे, अजयभाऊ बोढारे, रमेश मानकर, नरुभाऊ जिचकार, सुनील बोंडे, दत्तू वानखेडे, बंडू चौधरी, सुरेश लांबट, अशोक धोटे, गुलाब भोयर आदी उपस्थित होते.याप्रसंगी भुसारी महाराज यांनी समाजाला सामूहिक विवाह सोहळ्याचे महत्त्व आपल्या प्रवचनातून सांगितले. वैशाली चोपडे यांनी विवाह सोहळा ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. मंडळाचे अध्यक्ष रमेश चोपडे, उपाध्यक्ष कृष्णाजी बोराटे, रमेश गोरले, सचिव राजेश ढोक, सहसचिव रवि महल्ले, कोषाध्यक्ष रामदास साबळे, संचालक नानाजी सातपुते, शरद जिचकार, सुवर्णा देशमुख, वैशाली कोहळे, विनोद बोरकुटे, सुनील कोडे, नरेंद्र गोरले, अॅड. संजय डोईफोडे, रविप्रकाश ढोक, सल्लागार अविनाश कातडे, कमलेश वानखेडे, प्रवीण विघरे, प्रभाकर गोतमारे, नखाते, किसन गावंडे, संजय ठाकरे, कायदा सल्लागार अॅड. महेश महल्ले, अॅड. सुरेश काळे, अॅड. मंगेश निलजकर, आयोजन समितीचे नरेश बरडे, नंदू ढोक, श्रावण अखंड, सुभाष तराणे, नरेश चोपडे, राजू फुटाणे, नाना केने, धर्मराज बोलधने, लीलाधर अढाऊ, शुभम पोतदार, ममता डुकरे, आशा बोराटे, रेखा वांढे, अर्चना सोलव, विष्णू वाकोडे आदींनी परिश्रम घेतले.