लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मृग नक्षत्र सुरू होण्यास अजून दोन दिवस वेळ असला तरी मान्सूनची सलामी मात्र विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यात झाली आहे. यामुळे दिवसाच्या तापमानासोबतच रात्रीचेही तापमान बरेच खालावल्याचे जाणवत आहे.
नागपुरात मागील २४ तासामध्ये ०.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. दुपारच्या पावसामुळे रात्रीच्या तापमानावर बराच परिणाम जाणवला. रात्री पारा बराच खाली आल्याने सकाळी शनिवारी सकाळी आर्द्रता ८६ टक्के होती. दुपारी १२ वाजतानंतर चांगले उन्ह तापले. मात्र सायंकाळी आर्द्रता अधिक न घटता ६० टक्क्यांवर होती. यामुळे वातावरणात बराच बदल जाणवत होता. शहरातील तापमानामध्ये कालच्यापेक्षा ०.४ अंश सेल्सिअसने वाढ होऊन पारा ३७.२ अंशावर होता.
विदर्भातही शनिवारी तापमान बरेच खालावलेले होते. बुलडाण्यामध्ये सर्वात कमी ३३ अंश सेल्सिअसची नोंद झाली. मागील २४ तासात गोंदियात २० मिमी पाऊस पडला. तेथील तापमान ३५ अंशावर होते. गडचिरोली आणि चंद्रपुरात अनुक्रमे ९.१ आणि ८.२ मिमी पाऊस पडला. या दोन्ही ठिकाणी पारा अनुक्रमे ३५.२ व ३६.४ अंश सेल्सिअसवर होता. वर्धा येथेही ०.३ मिमी पावसाची नोंद झाली. तेथील तापमानाचा पारा ३७ वर होता. अकोल्यात ३६.८ अंश सेल्सिअसवर तापमान होते. तिथे मागील २४ तासात ०.३ मिमी पावसाची नोंद आहे. यवतमाळातही पारा ३६ वर होता.
२४ तासातील पाऊस
अकोला : ०.३
अमरावती : १.८
बुलडाणा : ०
चंद्रपूर : ८.२
गडचिरोली : ९.१
गोंदिया : २०.०
नागपूर : ०.३
वर्धा : ०.६
वाशिम : ०
यवतमाळ : अप्राप्त
विदर्भातील तापमान जिल्हा : कमाल : किमान
अकोला : ३६.८ : २४.८
अमरावती : ३५.४ : २४.७
बुलडाणा : ३३.० : २३.०
चंद्रपूर : ३६.४ : २२.८
गडचिरोली : ३५.२ : २४.२
गोंदिया : ३५.० : २२.५
नागपूर : ३७.२ : २४.३
वर्धा : ३७.० : २४.९
वाशिम : ३५.० : २१.०
यवतमाळ : ३६.० : अप्राप्त