लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २० टक्के अनुदान प्राप्त झालेल्या सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान द्यावे यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने ७ जुलै रोजी सेवाग्राम ते नागपूर पायी दिंडी काढण्यात आली. दिंडीत शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. पायी दिंडी मंगळवारी यशवंत स्टेडियमला पोहोचल्यानंतर यशवंत स्टेडियम येथून विधानभवनावर मोर्चा काढला. पोलिसांनी मॉरिस टी पॉईंट येथे मोर्चा अडविला. मोर्चात सहभागी शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार नारेबाजी करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मोर्चातील शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. शिक्षणमंत्र्यांनी मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. परंतु शिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनामुळे समाधान न झालेल्या शिक्षकांनी विधानसभेत घोषणा केल्याशिवाय मोर्चा मागे घेणार नसल्याचे सांगून मोर्चास्थळीच ठाण मांडले. रात्री उशिरापर्यंत हा मोर्चा मॉरिस टी पॉईंटवर तळ ठोकून होता. या मोर्चाचे नेतृत्व एस. यु. म्हसकर, खंडेराव जगदाळे, पुंडलिक रहाटे, आर. झेड. बावीस्कर, प्रकाश पाटील, उदय देशमुख आदींनी केले. अघोषित असणाऱ्या सर्व शाळा अनुदानासह घोषित कराव्यात, आदिवासी विकास क्षेत्रातील शाळांना शासन धोरणानुसार १०० टक्के अनुदान द्यावे,२० टक्के शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावे आदी मागण्या या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.
विधानसभेत घोषणा करण्याच्या मागणीसाठी अडला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 10:14 PM
२० टक्के अनुदान प्राप्त झालेल्या सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान द्यावे यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने ७ जुलै रोजी सेवाग्राम ते नागपूर पायी दिंडी काढण्यात आली. शिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनामुळे समाधान न झालेल्या शिक्षकांनी विधानसभेत घोषणा केल्याशिवाय मोर्चा मागे घेणार नसल्याचे सांगून मोर्चास्थळीच ठाण मांडले. रात्री उशिरापर्यंत हा मोर्चा मॉरिस टी पॉईंटवर तळ ठोकून होता.
ठळक मुद्दे२० टक्के अनुदान प्राप्त शाळांना १०० टक्के अनुदानाची मागणीमहाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीचा मोर्चासेवाग्राम ते नागपूर काढली पायी दिंडी