ठळक मुद्देसंविधानाची माहिती शिक्षक, विद्यार्थ्यांना द्या - मागणी
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रहित लक्षात घेता संविधानाची मूलभूत तत्त्वे मनामनात रुजविणे व ती घराघरात पोहचविणे काळाची गरज आहे, म्हणून संविधानाची माहिती शिक्षण संस्थेद्वारे विद्यार्थी व शिक्षकांना अनिवार्य करावी, अशी मागणी लोकसेवा संघटनेच्या मोर्चातून करण्यात आलीसंघटनेच्या या मोर्चात केवळ पाचच लोक होते. यशवंत स्टेडियम येथून निघालेल्या या मोर्चात कुठलेही बॅनर नव्हते. व्हाईट बोर्डवर संविधानाचे महत्त्व लिहून ते हाती घेऊन मोर्चेकरी मोर्चाच्या ठिकाणी आले होते. विशेष म्हणजे, यांना संरक्षण देण्यासाठी १० वर पोलीस होते. मोर्चाचे नेतृत्व मोरेश्वर बागडे, चंद्रकात बोंधाटे, बशीर पठाण, प्रशांत इंगळे यांनी केले.मागण्या:
- भारतीय शिक्षण संस्थेत संविधान उद्देशिका प्रत्येक पुस्तकात नमूद करावी
- संविधान विषयक पाठ्यक्रम असावे
- पत्रकारांना टोल नाके मोफत करावे
- हिंगणा विधानसभा क्षेत्रातील गरजू अभियंता व तंत्रज्ञांना स्वत:च्या कारखान्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी