लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासन निर्णय होऊनही अनुदानाच्या निधीची तरतूद झाली नाही. या विधिमंडळात ही तरतूद व्हावी, या मागणीसाठी उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचामोर्चा मंगळवारी रात्रभर रस्त्यावर थांबून होता. बुधवारी या मोर्चाचे शिष्टमंडळ तीन शिक्षक आमदारांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांनी अनुदान देण्याचे आश्वासन दिले. परिणामी मोर्चाचे विसर्जन झाले. परंतु जोपर्यंत निधीची तरतूद होत नाही, तोपर्यंत धरणे सुरू ठेवण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला.शासन निर्णयानुसार हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी टाकून अनुदानाची तरतूद करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटनेच्यावतीने मंगळवारी शिक्षकांनी विधिमंडळावर मोर्चा काढला. मोर्चाचे शिष्टमंडळ वित्तमंत्री जयंत पाटील यांना भेटले. परंतु त्यांच्याकडून ठोस आश्वासन मिळाले नाही. यामुळे मोर्चाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अडून राहिले. रात्री शिक्षक रस्त्यावरच ठाण मांडून होते. गुरुवारी शिक्षक आमदार विक्रम काळे, सुधीर तांबे व श्रीकांत देशपांडे यांच्या नेतृत्वात संघटनेचे राजाध्यक्ष प्रा. दीपक कुळकर्णी, कार्याध्यक्ष प्रा. संतोष वाघ व पौर्णिमा रामेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर केले. यावर मुख्यमंत्र्यांनी अनुदान उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन दिले. यामुळे मोर्चाचा विसर्जनाचा निर्णय घेण्यात आला. परंतु जोपर्यंत अनुदानाच्या निधीची तरतूद होत नाही, तोपर्यंत यशवंत स्टेडियम येथे धरणे आंदोलन सुरू ठेवू, असा निर्णयही संघटनेने घेतला.
रात्रभर थांबला मोर्चा : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर विसर्जन, पण धरणे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 8:27 PM
शासन निर्णय होऊनही अनुदानाच्या निधीची तरतूद झाली नाही. या विधिमंडळात ही तरतूद व्हावी, या मागणीसाठी उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचा मोर्चा मंगळवारी रात्रभर रस्त्यावर थांबून होता.
ठळक मुद्देउच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेचा मोर्चा