शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

नागपूर लाईव्ह सिटी अ‍ॅपवर १० हजाराहून अधिक तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 1:16 AM

नागरिकांना महापालिकेच्या कामासाठी कार्यालयात येण्याची गरज भासू नये म्हणून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘नागपूर लाईव्ह सिटी अ‍ॅप’ तयार केले आहे. या अ‍ॅपला आजपर्यंत जवळपास २३ हजार नागपूरकरांनी डाऊनलोड केले आहे. यावर १०,२४८ तक्रारी प्राप्त झाल्या असून ९,३०२ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांना महापालिकेच्या कामासाठी कार्यालयात येण्याची गरज भासू नये म्हणून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘नागपूर लाईव्ह सिटी अ‍ॅप’ तयार केले आहे. या अ‍ॅपला आजपर्यंत जवळपास २३ हजार नागपूरकरांनी डाऊनलोड केले आहे. यावर १०,२४८ तक्रारी प्राप्त झाल्या असून ९,३०२ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.प्राप्त तक्रारीपैकी मात्र ८०० प्रलंबित आहेत आणि १४६ तक्रारी नागरिकांकडून पुन्हा उघडण्यात आल्या आहे. नागरिकांनी सिवर लाईन, कचरा, रस्ते निर्माण, पथदिवे, मोकाट कुत्रे, रस्त्यावरील अतिक्रमणे याबाबत तक्रारी नोंदविल्या आहेत.तक्रारींवर माहितीही संबंधित नागरिकांना अ‍ॅपच्या माध्यमातूनच देण्यात आली. नागपूर शहरातील कुठल्याही व्यक्तीला मूलभूत सोईसुविधांविषयी कुठलीही तक्रार असेल तर सदर अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. सदर अ‍ॅप सध्या अ‍ॅन्ड्रॉईड यूजर्ससाठी असून प्ले-स्टोअरमधून ते डाऊनलोड करता येईल अथवा http:// www .nmcnagpur. gov .in / grievance या लिंकवरून पोर्टलला भेट देता येईल. या अ‍ॅपमुळे आता नागरिकांना महानगरपालिकेशी संबंधित पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, स्वच्छता, मालमत्ता कर, जन्म-मृत्यू नोंदणी, धोकादायक इमारती, रस्त्यावर पडलेली झाडे, मलवाहिनी, उद्यान आदींसंदर्भातील तक्रारी अ‍ॅपच्या माध्यमातून करण्याची सोय आता मनपाने उपलब्ध करून दिलेली आहे.विशेष म्हणजे अ‍ॅपच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींवर तुकाराम मुंढे यांचे नियंत्रण असून याचा ते वेळोवेळी आढावा घेतात. संबंधित तक्रारींची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांना दिली असून निर्धारीत वेळेच्या आत तक्रारीचे निराकरण झाले नाही तर अ‍ॅपच्या माध्यमातूनच संबंधित अधिकाºयाला कारणे दाखवा नोटीस जाते. हे अ‍ॅप नागरिकांसाठी उपयुक्त असून नागरिकांनी तक्रारींचे निराकरण करण्यासाठी या अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका