शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

मेळघाटात पाच वर्षांत चौदाशेहून अधिक बालमृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2021 7:30 AM

Nagpur News २०१७ पासून मेळघाटात चौदाशेहून अधिक अर्भक व बालमृत्यू झाले आहेत. कागदावर कुपोषण नसल्याचे सांगण्यात येत असले, तरी विदारक स्थिती कायम आहे.

ठळक मुद्देविदर्भाच्या दुर्गम भागातील वास्तव सुविधांचे दावे, मग मृत्यूंचे कारण काय?

नागपूर : मेळघाटमध्ये मागील पाच वर्षांत कुपोषणामुळे एकाही लहान मुलाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा राज्य शासनातर्फे करण्यात आला होता. परंतु, प्रत्यक्षात २०१७ पासून मेळघाटात चौदाशेहून अधिक अर्भक व बालमृत्यू झाले आहेत. कागदावर कुपोषण नसल्याचे सांगण्यात येत असले, तरी विदारक स्थिती कायम आहे. अशा स्थितीत राज्यातील माता व बालमृत्यू थांबणार तरी कसे व या मृत्यूंचे नेमके कारण तरी काय? याचे उत्तर कोण देणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. (More than 1400 child deaths in Melghat in five years)

मेळघाट क्षेत्र हे ३२३ गावांनी बनले असून, तेथील लोकसंख्या ३ लाख ३ हजार ४८० इतकी आहे. त्यातील २ लाख ३५ हजार २४१ नागरिक आदिवासी आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्याच आकडेवारीनुसार मार्च २०१७ ते ३१ मे २०२१ या कालावधीत १ हजार ४४९ बाल व अर्भक मृत्यू झाले. यात ० ते २८ दिवसांच्या वयोगटातील नवजात बाळांची संख्या ७४२ इतकी होती, तर ४३२ अर्भकांचा मृत्यू झाला. १ ते ६ या वयोगटातील ३४५ बालकांचा मृत्यू झाला.

योजनांच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह

यातील एकही मृत्यू कुपोषणामुळे झालेला नसून, सर्व मृत्यू विविध आजारांमुळे झाले आहेत, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. कुपोषण आटोक्यात आणण्याचा दावा प्रशासन करीत असले, तरी या मोठ्या प्रमाणातील बालमृत्यूंमुळे योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

लोकप्रतिनिधी कधी जागे होणार?

विदर्भातील गडचिरोली, अमरावती जिल्ह्यांत आदिवासी क्षेत्रात बाल आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात अशी स्थिती असती तर तेथील नेत्यांनी प्रशासनाला सळो की पळो करून सोडले असते. मात्र, विदर्भातील लोकप्रतिनिधींमध्ये यासंदर्भात उदासीनता दिसून येत आहे.

 

वर्ष - अर्भक मृत्यू - नवजात अर्भक मृत्यू (० ते २८ दिवस) - बालमृत्यू (१ ते ६ वर्षे)

मार्च २०१७ - १६० - १२० - १२७

मार्च २०१८ - १५१ - ६६ - ५१

मार्च २०१९ - १४४ - १०१ - ६४

मार्च २०२० - १२२ - ७४ - ५०

मार्च २०२१ - १५५ - ५७ - ४१

मे २०२१ - १० - १४ - १२

टॅग्स :Melghatमेळघाट