शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

सिंचन घोटाळ्यात आणखी दणका

By admin | Published: March 31, 2016 3:10 AM

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळअंतर्गत सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी करीत असलेल्या अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग)..

नागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळअंतर्गत सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी करीत असलेल्या अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग) मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याचे मातीकाम व बांधकामाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात तीन अधिकारी व कंत्राटदार कंपनीचे संचालक आणि त्यांचे भागीदार यांचा समावेश आहे.सेवानिवृत्त मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी (६५) रा. मल्हार प्लॉट नं.२१ सहकारनगर उस्मानपुरा औरंगाबाद, गोसीखुर्द डावा कालवा वाही पवनीचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उमाशंकर वासुदेव पर्वते (५९) रा. सरस्वतीनगर मानेवाडा रिंगरोड, वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी चंदन तुळशीराम जिभकाटे (५७) रा. आयुर्वेदिक ले-आऊट उमरेड रोड अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. तर कंत्राटदार आर.जे शाह अ‍ॅण्ड कंपनी लि. मुंबईच्या संचालिका कालिंदी राजेंद्र शाह (६७), तेजस्विनी राजेंद्र शाह (६४), त्यांचे भागीदार डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीचे संचालक विशाल प्रवीण ठक्कर (३६), प्रवीण नाथालाल ठक्कर (६७), जिगर प्रवीण ठक्कर (३८), अरुण कुमार गुप्ता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याच्या गृहविभागाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरअंतर्गत सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारासंदर्भात उघड चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या नेतृत्त्वाखाली ही चौकशी सुरूआहे. गैरकायदेशीर कृत्यावर शिक्कामोर्तब नागपूर : दराडे यांनी पोलीस उपअधीक्षक मिलिंद तोतरे यांना मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याचे मातीकाम व बांधकाम या कामातील निविदा प्रक्रियेदरम्यान झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यास सांगितले होते. या चौकशीमध्ये नमूद कालव्याच्या कामाचे कंत्राटदार आर.जे. शाह अ‍ॅण्ड कंपनी आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (जे.व्ही.) तसेच जलसंपदा विभागातील अधिकारी यांचा गैरव्यवहारामध्ये सहभाग असल्याचे दिसून आले. याबाबत चौकशी अधिकारी यांनी बुधवारी सदर पोलीस स्टेशन येथे अप. क्र. ३३०९,/२०१६ कलम १३ (१) (क), १३ (१) (ड), सह कलम १३ (२), लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ सह कलम ४२०, ४६८, ४७१, १०९, १२० (ब) भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.एसीबीचे अधीक्षक संजय दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याच्या निविदा प्रक्रियेदरम्यान विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांनी सन २००९ मध्ये निविदा मागविल्या होत्या. त्यावेळी चार कंत्राटदार कंपन्यांनी या निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतला, असे दाखविण्यात आले होते. त्यात आर. जे. शाह अ‍ॅण्ड कंपनी आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा.लि. (जे.व्ही) या फर्मला सदर कालव्याच्या कामाचे कंत्राट देण्यात आले. चौकशीमध्ये आर.जे. शाह अ‍ॅण्ड कंपनी लि. आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (जे.व्ही) व इतरांनी ही निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक झाल्याचे दाखविण्याकरिता ठक्कर परिवाराचेच एस. एन. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या कंपनीने निविदा प्रक्रियेत भाग घेतला. तसेच अन्य प्रतिस्पर्धी कंत्राटदार श्रीनिवासा कन्स्ट्रक्शनच्या निविदेसोबत भरावयाची बयाणा रक्कम डी. कन्स्ट्रक्शन्स प्रा.लि. या कंपनीच्या बँक खात्यातून भरण्यात आली. यशस्वी कंत्राटदार कंपनीपैकी डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या भागीदाराने कामाच्या पूर्वानुभवासंदर्भात सादर केलेली सबकॉन्ट्रॅक्टची प्रमाणपत्रे ही अवैध असल्याचे त्यांनी पूर्वअर्हता अर्जासोबत खोटी माहिती सादर केल्याचे तसेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत त्यांच्याकडे असलेल्या कामाविषयीची महत्त्वाची माहिती दडवून ठेवल्याचे आणि निविदा प्रक्रियेदरम्यान तत्कालीन अधिकाऱ्यांनी निविदा प्रक्रिया अपारदर्शीपणे व कंत्राटदाराला फायदा पोहोचविण्यासाठी गैरकायदेशीर कृत्य केल्याचे आढळून आले. (प्रतिनिधी)३८ फाईल रांगेत एसीबीकडे २५ कोटी रुपयापेक्षा अधिक किमतीच्या ४० प्रकरणांची चौकशी सोपविण्यात आली आहे. आतापर्यंत दोन प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अजून ३८ प्रकरण रांगेत आहेत. अशा परिस्थितीत येणाऱ्या काही दिवसात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. संजय दरडे यांनी एसीबी अधीक्षकाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंगळवारी पहिल्यांचा अधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी गुन्हा दाखल झाल्याने शासकीय विभागांमध्ये खळबळ उडाली आहे.