लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात नागपूर विभाग शेवटच्या स्थानी असला तरी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यंदा निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळविली आहे. विशेष म्हणजे यात २७ हजार विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीतील आहेत.विभागीय मंडळाच्या आकडेवारीनुसार यंदा नागपूर विभागात एकूण ७९ हजार २१० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ही आकडेवारी ५४.१० टक्के इतकी आहे. यात २६ हजार ९९९ विद्यार्थी हे प्रावण्ीय श्रेणीतील आहेत. तर ५२ हजार २२१ विद्यार्थी प्रथम श्रेणीतील आहेत. मागील वर्षी २१,७६३ विद्यार्थी प्रावीण्य तर ५०,६३१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले होते.नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १२ हजार २६३ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले तर प्रथम श्रेणीत १७ हजार ९१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विद्यार्थ्यांची श्रेणीनिहाय आकडेवारीजिल्हा प्रावीण्य श्रेणी प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणीभंडारा २,७२८ ६,१४० ६,२३७चंद्रपूर ३,८९० १०,०५४ १०,६३१नागपूर १२,२६३ १७,९१८ १८,०९२वर्धा २,८२९ ५,२४० ५,५३९गडचिरोली १,४०८ ५,०७९ ६,०७१गोंदिया ३,८२७ ७,७८० ६,९६३एकूण २६,९९९ ५२,२२१ ५३,५३३९० टक्क्यांहून अधिक गुण कुणाला?आश्चर्याची बाब म्हणजे थोड्याथोडक्या नव्हे तर ३ हजार ६८८ विद्यार्थ्यांना ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त झाले आहेत. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ही टक्केवारी २.४३ टक्के इतकी आहे. तर १२ टक्के विद्यार्थ्यांना ४५ टक्क्यांहून कमी गुण प्राप्त झाले आहेत.टक्केनिहाय विद्यार्थीनिकालातील टक्केवारी विद्यार्थी एकूण टक्का९० टक्क्यांहून अधिक ३,६८८ २.४३८५-९० ५,२४१ ३.४६८०-८५ ७,६०१ ५.०१७५-८० १०,५०६ ६.९३७०-७५ १३,६६० ९.०१६५-७० १६,९५९ ११.१९६०-६५ २१,८२२ १४.४०४५-६० ५३,९०३ ३५.५६
नागपूर विभागात निम्म्याहून अधिक विद्यार्थी ‘फर्स्ट क्लास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 8:15 PM
राज्यात नागपूर विभाग शेवटच्या स्थानी असला तरी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यंदा निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळविली आहे. विशेष म्हणजे यात २७ हजार विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीतील आहेत.
ठळक मुद्देप्रथम श्रेणीत सर्वाधिक उत्तीर्ण : विभागात नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मिळविला ‘क्लास’