आॅनलाईन लोकमतनागपूर: भारतीय जलतरणपटूंकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगायची झाल्यास भारतीय जलतरण क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत आॅलिम्पिकपटू संदीप सेजवाल याने सोमवारी व्यक्त केले.एका समारंभासाठी पहिल्यांदा नागपुरात आलेला २०१४ च्या आशियाडचा कांस्य विजेता सेजवालने एसजेएएनतर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात जलतरणातील समस्या आणि उपाययोजना यावर मत नोंदविले.जलतरणातील सद्यस्थितीवर बोलताना तो म्हणाला,‘आधीच्या तुलनेत भारतीय जलतरणपटू सध्या चांगली कामगिरी करीत आहेत. मागील दोन आशियाडमध्ये आम्हाला पदके मिळाली, पण सुधारणा घडून येण्यास आणखी वेळ लागेल. मूळचा दिल्लीचा असलेला संदीप सेजवाल सध्या बेंगळुरू येथे पुढीलवर्षी जकार्ता येथे आयोजित आशियाडची तयारी करीत आहे.सुधारणा घडून येण्यासाठी देशात स्पर्धांची संख्या वाढविण्याची गरज आहे. युरोपियन देशांच्या तुलनेत आपल्याकडे स्पर्धांची संख्या नगण्य आहे. केवळ राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन पुरेसे नाही, असे ५०, १०० आणि २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकचा राष्ट्रीय विक्रमवीर आणि सिनियर राष्ट्रीय विजेता असलेल्या सेजवालने सांगितले. जलतरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याशिवाय भारतात या खेळाचा दर्जा उंचावणार नाही. खेळाडूंना नोकऱ्यांची संधी आणि आर्थिक मदतीचा अभाव ही देखील खेळाच्या माघारीची प्रमुख कारणे आहेत.१८ वर्षांखालील गटाच्या स्पर्धांना ग्लेनमार्कने शिष्यवृत्तीच्या रूपाने आर्थिक पाठबळ दिल्यामुळे ज्युनियर स्तरावर आशेचा किरण जगताना दिसत आहे. यातून देशाला आॅलिम्पिक दर्जाचे जलतरणपटू गवसतील, असा विश्वास पश्चिम रेल्वेचा कर्मचारी असलेला सेजवाल याने व्यक्त केला.पॅराजलतरणात विश्व स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती कांचनमाला पांडे हिच्या कामगिरीचे त्याने कौतुक केले. तत्पूर्वी रातुम नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा विभाग संचालिका डॉ. कल्पना जाधव आणि शहरातील जलतरण संघटकांनी सेजवालचे स्वागत केले.
जलतरणात आमूलाग्र सुधारणा करण्याची अधिक गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 9:53 PM
भारतीय जलतरणपटूंकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगायची झाल्यास भारतीय जलतरण क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत आॅलिम्पिकपटू संदीप सेजवाल याने सोमवारी व्यक्त केले.
ठळक मुद्देआॅलिम्पिकपटू संदीप सेजवालचे मत