शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:08 AM

सावनेर/ काटोल/ नरखेड/ कळमेश्वर/ कामठी/ उमरेड /कुही/ रामटेक/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. ...

सावनेर/ काटोल/ नरखेड/ कळमेश्वर/ कामठी/ उमरेड /कुही/ रामटेक/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. मंगळवारी जिल्ह्यात ३४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर २००५ रुग्णांची नव्याने भर पडली. मंगळवारी जिल्ह्यात ग्रामीण भागात २०४८ नागरिकांनी कोरोनावर मात केली. ग्रामीण भागात आतापर्यंत ८५,४९६ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ५६,४२६ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. १३ तालुक्यांत आतापर्यंत १५११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २८,०३५ इतकी आहे.

नरखेड तालुक्यात ९४ रुग्णांची भर पडली. यात शहरातील १६, तर ग्रामीण भागातील ७८ रुग्णांचा समावेश आहे. सध्या ग्रामीण भागातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १६४९, तर शहरातील २८३ इतकी झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत येणाऱ्या गावात (६), जलालखेडा प्राथमिक आरोग्य कोंद्र (३०), मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्र (२८), तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावात १४ रुग्णांची नोंद झाली.

काटोल तालुक्यात ८५९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील ५८, तर ग्रामीण भागातील ३२ रुग्णांचा समावेश आहे.

रामटेक तालुक्यात १६१ रुणांची भर पडली. यात रामटेक शहरातील ३०, तर ग्रामीण भागातील १३१ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ४५६८ नागरिक बाधित झाले आहेत. यातील २२७० रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ६२ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या तालुक्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २२९८ इतकी आहे.

कळमेश्वर तालुक्यात २०१ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रात २६, तर ग्रामीण भागात १७५ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात मोहपा येथे २२, तेलकामठी (१९), वरोडा (१३) तर धापेवाडा येथे १३ रुग्णांची नोंद झाली.

कुही तालुक्यात ६४७ नागरिकांची चाचणी करण्यात आली. यात ८१ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. उमरेड तालुक्यात ९४ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ४९, तर ग्रामीण भागातील ४५ रुग्णांचा समावेश आहे. कामठी तालुक्यात ८७६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १४१ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

हिंगण्यात स्थिती बिघडली

हिंगणा तालुक्यात १२९८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात १७५ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. वानाडोंगरी येथे सर्वाधिक ४१ रुग्णांची नोंद झाली. सध्या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९३२४ इतकी झाली आहे. यातील ५८६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.