शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सकाळी नोकरी गेली, रात्री जीव गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 12:51 AM

भूविकास बँकेच्या ३६ कर्मचाºयांना सेवामुक्त करण्यात येत असल्याचा आदेश अवसायकाने जारी केला. दसºयाच्या आदल्या दिवशी संबंधित आदेश कर्मचाºयाच्या हाती पडला.

ठळक मुद्देभूविकास बँकेच्या कर्मचाºयांवर संकट : ३६ कर्मचारी सेवामुक्त

कमलेश वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूविकास बँकेच्या ३६ कर्मचाºयांना सेवामुक्त करण्यात येत असल्याचा आदेश अवसायकाने जारी केला. दसºयाच्या आदल्या दिवशी संबंधित आदेश कर्मचाºयाच्या हाती पडला. आपल्या भविष्याचे काय होणार, दोन मुलींच्या शिक्षणाचे कसे होणार या चिंतेने त्याने धसका घेतला. रात्री हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि जीवच गेला. रवींद्र गुलाबराव धांडे यांच्यासोबत हा दुर्दैवी प्रकार घडला.खरबी रोड येथील रहिवासी असलेले रवींद्र गुलाबराव धांडे (वय ५५) भूविकास बँकेत नोकरीवर होते. सरकारतर्फे या बँकेवर अवसायकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या ३३ महिन्यांपासून त्यांना पगार मिळाला नव्हता. धांडे यांना दोन मुली आहेत. दोन्ही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत. घरचा खर्च व मुलींचे शिक्षण असा दुहेरी भार विना पगाराने उचलणे कठीण होते. मात्र, तरीही त्यांनी हिंमत सोडली नाही. कधीतरी बँक सुरळीत होईल. आपली हक्काची देणी मिळतील व सर्वकाही ठीक होईल, या आशेवर त्यांचा जीवनसंघर्ष सुरू होता.२९ सप्टेंबर रोजी दुपारी आपल्याला सेवामुक्त करण्यात येत असल्याचा अवसायक डीडीआर सतीश भोसले यांनी काढलेला आदेश धांडे यांना मिळाला. त्यात नोकरी संदर्भातील आपली देणी उपलब्धतेनुसार व प्राधान्य क्रमानुसार दिली जातील, असे नमूद होते. पैसे कधी मिळतील याची निश्चित कालमर्यादा आदेशात नमूद नाही. हे पाहून धांडे यांना धक्का बसला. दिवसभर ते चिंताग्रस्त राहिले. दोन्ही मुलींचे इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू आहे, अजून लग्न व्हायची आहेत. अशात आपली नोकरी गेली यामुळे ते पुरते खचले. ३० सप्टेंबरच्या पहाटे या चिंतेत त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला व त्यातच त्यांचे निधन झाले. दसºयाच्या दिवशी लोक एकमेकांना सोनं देऊन शुभेच्छा देत असताना धांडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.धांडे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. या घटनेमुळे भूविकास बँकेच्या कर्मचाºयांमध्ये तीव्र रोष पसरला आहे. एकीकडे सरकार विविध प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च करते. तर दुसरीकडे भूविकास बँकेच्या कर्मचाºयांना त्यांचा हक्काचा पैसा देण्यासही टाळाटाळ करून त्यांचे जीव जाण्याची वाट पाहत आहे, असा संताप कर्मचाºयांनी व्यक्त केला आहे.३६ कर्मचाºयांची परिस्थिती वाईटसेवामुक्त करण्यात आलेल्या ३६ कर्मचाºयांनी शासनाच्या या भूमिकेमुळे धसका घेतला आहे. ३६ महिन्यांपासून पगार नसल्यामुळे आधीच हे कर्मचारी आर्थिक विवंचनेचा सामना करीत आहेत. अशात सरकारने सेवामुक्त करताना हक्काचे पैसे कधी मिळतील याची कालमर्यादा दिली नसल्यामुळे या कर्मचाºयांवरील मानसिक दडपण वाढले आहे.