लोकमत न्यूत नेटवर्कनागपूर : सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने ‘मॉर्निंग वॉक’ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र सकाळी फिरायला जाणारी काही मंडळी नुसतीच फिरत नसून ती शेतीतील हरभरा आणि भाजीपाल्याची चोरी करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे कोराडीनजीकच्या घोगली येथील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत.कोराडी व परिसरातील काही गावांमधील नागरिक घोगली शिवारात रोज सकाळी फिरायला जातात. यातील काही हौशी मंडळी रोडलगतच्या शेतांमध्ये शिरतात आणि शेतातील हरभरा, मेथी, पालक, गाजर यासह अन्य भाजीपाला चोरून नेतात. घोगली येथल हरिभाऊ देवमन भांगे यांची शेती रोडलगत आहे. त्यांनी बाजारात विक्रीला नेण्यासाठी शेतातील मेथी गुरुवारी सायंकाळी उपटून शेतातच ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी (शुक्रवारी) फिरायला येणाऱ्यांनी ही मेथी चोरून नेली. ही मंडळी रोज सकाळी हातात मावेल इतका हरभरा उपटून नेत असल्याचेही हरिभाऊ भांगे यांनी सांगितले.सध्या या परिसरात असलेल्या तलावाचे पर्यटनाच्या दृष्टीने सौंदर्यीकरण केले जात आहे. त्यात तलावाची पाळ उंच व रुंद करण्यात आली. ही पाळ नांदा व कोराडी येथील नागरिकांसाठी ‘मॉर्निंग वॉक’च्या दृष्टीने पर्वणी ठरल्याने या भागात फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. या भागातील शेतकरी भाजीपाल्याची पिके घेत असून, ते आधी भाजीपाला उपटून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी विक्रीला नेतात. शुक्रवारी सकाळी या भागात फिरायला जाणाऱ्यांपैकी बहुतेकांच्या हातात मेथी दिसत आल्याची माहिती काहीं प्रत्यक्षदर्शींनी दिली. या प्रकरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, याला आळा घालणार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
नागपूरनजीकच्या कोरडी भागात शेतकऱ्यांसाठी ‘मॉर्निंग वॉक’ ठरतेय डोकेदुखी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 8:13 PM
सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने ‘मॉर्निंग वॉक’ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र सकाळी फिरायला जाणारी काही मंडळी नुसतीच फिरत नसून ती शेतीतील हरभरा आणि भाजीपाल्याची चोरी करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे कोराडीनजीकच्या घोगली येथील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत.
ठळक मुद्देशेतीमालाची चोरी वाढली : घोगली येथील शेतकरी त्रस्त