मानवाने निसर्गाशी खेळल्यास काय परिणाम हाेतात, ते काेराेनाने दाखवून दिले आहे. तरीही शहाणपण घेतलेले दिसत नाही. चुकांवर चुका केल्या जात आहेत. हजाराे झाडे ताेडून पुन्हा ताेच कित्ता गिरवला जात आहे. याचे परिणाम भाेगावे लागतील.
- गाेपाल सिंह
लाेक जागले आहेत
सिटीझन फाेरमने या माेहिमेसाठी चांगला प्रचार केला. लाेकांचाही अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. लाेक जागे हाेत आहेत, जुळत आहेत. हे आंदाेलन थांबणार नाही.
- शिवा लाडकर
झाडांचे कर्ज फेडण्याची वेळ
आम्ही भगवाननगरला राहताे. निसर्गाने भरभरून दिले आहे म्हणून आस्था आहे. अजनीतील हजाराे झाडांची कत्तल राेखून त्यांचे कर्ज चुकविण्याची वेळ आली आहे. मी माझ्या संस्थेसह या माेहिमेत सहभागी हाेण्याचा संकल्प करीत आहे.
- मनीष चांदेकर, जागृत नागरिक
पर्यावरणाच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे
अविचारीपणे हजाराे झाडांवर कुऱ्हाड चालविणारे पर्यावरणाचे शत्रू आहेत. ते मजबूत आहेत पण आम्ही हार मानणार नाही. आमच्यासाठी व पुढच्या पिढीसाठी हा लढा आम्हाला लढावाच लागणार आहे.
- प्रणव खेरगडे, विद्यार्थी
भविष्यासाठी ड्रीम इनाेव्हेटर्स ()
तांत्रिक गाेष्टीत विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी तयार केलेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा ड्रीम इनाेव्हेटर्स ग्रुप अजनी बचाव माेहिमेत सहभागी झाला आहे. प्रणवसह निहाल मानकर, श्रेया थाेटकर, प्रज्वल भाेवते, वैभव शेंडे, प्राची भिमटे, प्राजक्ता उमरेडकर, तेजेश्वरी पालरपू या तरुणांनी अजनीवन संवर्धनाचा संकल्प केला. शुद्ध हवा घेण्याचा आमचा अधिकार आहे व पशुपक्ष्यांचाही. अजनीचा संदेश तरुणांपर्यंत पाेहचवायचा आहे. या झाडांना वाचवायचे आहे. सामाजिक जाणीव दाखविण्याची, झाेपलेल्या सरकारला जागविण्याची आता गरज आहे.