योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी शहरांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी किंवा बाजारपेठांच्या मार्गावर सर्वाधिक अपघात होतात असा समज आहे. मात्र प्रत्यक्षात नागपूरकरांसाठी रहिवासी भागात होणारे अपघातच सर्वाधिक धोकादायक ठरत आहेत. २०१९ मध्ये तब्बल ८० टक्के प्राणांतिक अपघात हे रहिवासी भागातच झाले होते. तर राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर जवळपास शंभर लोकांनी जीव गमावला होता.
एनसीआरबीच्या २०१९ च्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. २०१९ मध्ये नागपुरात १ हजार ११९ अपघात झाले. त्यात एकूण २७० नागरिकांचे बळी गेले व ८९९ लोक जखमी झाले. प्राणांतिक अपघातांत तब्बल २१८ जणांचा जीव रहिवासी भागांतील अपघातांत गेला. यात १८२ पुरुष तर ३६ महिलांचा समावेश होता. तर शाळा-महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्थांजवळ झालेल्या अपघातांमध्ये २८ पुरुष व ७ महिलांसह ३५ जणांना जीव गमवावा लागला. राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर अनुक्रमे १७२ व ७७ अपघात झाले व यात ९८ लोकांचा मृत्यू झाला.
कार्यालयीन घाई, जीवावर येईकार्यालय व आस्थापना सुरू होण्याची तसेच सुटण्याच्या वेळेतील घाई लोकांच्या जीवावर आली असल्याचे चित्र आहे. या सहा तासांत ३७६ अपघात झाले. ९ ते १२ च्या वेळेत १८७ अपघात झाले. तर रात्री ९ ते १२ या पार्टीटाईमच्या काळात १६७ अपघात झाले.