शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

सर्वाधिक होम क्वारंटाईन धरमपेठ झोनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:21 AM

नागपूर : नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन उच्च रक्तदाब, अस्थमा, क्षयरोग, कॅन्सर, एड्स, कुष्ठरोगी, ...

नागपूर : नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन उच्च रक्तदाब, अस्थमा, क्षयरोग, कॅन्सर, एड्स, कुष्ठरोगी, किडनी आदी आजारांवर घरीच उपचार करण्यात येत आहे. शहरात आतापर्यंत महापालिकेने १४९१५ नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे.

शहरातील ८१४८४ नागरिकांची यादी तयार करण्यात आली असून यातील सर्वाधिक १६५१८ रुग्ण धरमपेठ झोनमधील आहेत. यातील ३५८२ नागरिकांपर्यंत महापालिकेची चमू पोहोचली आहे. त्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना आवश्यक सल्ला देण्यात आला आहे. महापालिकेचे अप्पर आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, ‘मेरा परिवार, मेरी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत आरोग्य विभागाच्या सहकार्याने सर्वेक्षण करण्यात येत आहे. संबंधित यादीनुसार नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. आवश्यक सल्ल्यासोबत नागरिकांना व्हिटॅमिन सी व झिंकच्या गोळ्या देण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी घरी उपचार घेणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. महापालिका आरोग्य विभागाने २५ नोव्हेंबरपासून सर्वेक्षण सुरू केले आहे. १ डिसेंबरपर्यंत ९६०६ उच्च रक्तदाब, ४८१ अस्थमा, ३३ क्षयरोग, ७४ कॅन्सर, ९ एड्स, मधुमेहाचे ६७३३, हृदयरोगाचे २६१, कुष्ठरोगाचे १३, लठ्ठपणाचे ७, कोरोनापासून दुरुस्त झालेले ११८ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. ही माहिती महापालिकेच्या नोडल अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे यांनी दिली.

............

घरी उपचार घेणारे रुग्ण

झोन एकूण रुग्णांचे सर्वेक्षण

लक्ष्मीनगर १११८४ ७८०

धरमपेठ १६५१८ ३५८२

हनुमाननगर ७१२१ ६४५

धंतोली ८८३० ९५७

नेहरुनगर ११९६२ ३८३

गांधीबाग ८६६६ ३३०६

सतरंजीपुरा ३४८१ ८३

लकडगंज २४६१ २३०१

आसीनगर ६०५३ १५८७

मंगळवारी ५२०८ १२९१

...............