शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

मध्यरात्री 'तिने' प्रियकराला गुपचूप घरी बोलावले.. आईने दोघांना रंगेहात पकडले अन्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 1:58 PM

पाचपावली परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने मध्यरात्री आई-वडील झोपी गेल्यानंतर आपल्या प्रियकराला घरी बोलावले. पण, आई झोपेतून उठली व मुलगी तरुणासोबत 'नको त्या' अवस्थेत आढळली.

ठळक मुद्देप्रियकराला धू-धू धूतले

नागपूर : सोशल मीडियावर होणारी मैत्री आणि त्याचे प्रेमात रुपांतर हे 'इन्स्टंट रेसीपी'सारखे आहे. पटकन् तयार होऊन प्लेटमध्ये सज्ज! मात्र, इन्स्टंटच्या नादात कधी-कधी आपण आपले नुकसानही करून घेतो. असाच एक प्रकार नागपुरात समोर आला आहे.

पाचपावली परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणीने मध्यरात्री आई-वडील झोपी गेल्यानंतर आपल्या प्रियकराला गुपचूप घरी बोलावले. पण, आईला जाग आली व मुलगी तिच्या खोलीत तरुणासोबत 'नको त्या' अवस्थेत आढळली. यावेळी संतप्त आईने तरुणाला चांगले बदडले व पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 

सुरज ब्रम्हानंद लहाने (वय २७) असे आरोपीचे नाव आहे. अकराव्या वर्गात शिकणाऱ्या तरुणीची इन्स्टाग्रामवर तीन महिन्यापूर्वी सुरजशी ओळख झाली. सुरज हा फर्निचरचा कारागीर असून ऑर्डरनुसार घरोघरी काम करतो. तर, सुरज आणि स्वाती(बदललेले नाव) या दोघांची ऑनलाइन ओळख होऊन  त्याचे मैत्रीत रुपांतर झाले आणि मग ते प्रेमात बदलले. दोघांचं चॅटिंग सुरू झालं नंतर भेटीगाठीही वाढल्या.

तीन महिन्यातच स्वातीचा सुरजवर विश्वास बसला, ती त्याच्याकडे जास्तच ओढल्या गेली. तिने त्याला फुटाळ्यावर भेटण्यास बोलावले. याचा फायदा सुरजने घेतला. त्याने गोड-गोड बोलून शारीरिक संबंधाची मागणी केली. दरम्यान, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्वातीने सुरजला कॉल करून घरी बोलावले. त्यावेळी तिचे आई-वडील शेजारच्या खोलीत झोपले होते. सुरजने घराजवळ येताच तिला मिसकॉल दिला आणि स्वातीने हळूच दार उघडून त्याला घरात घेतले.

प्यार का पंचनामा

काही वेळानंतर, स्वातीच्या आईला जाग आली व  लघुशंकेला झोपेतून उठून बाथरुममध्ये गेली. दरम्यान, तिला स्वातीच्या खोलीतून आवाज येत असल्याचे लक्षात आले. तिला शंका आली व काळजीपोटी तिने मुलीच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि लाईट लावला. यावेळी आपल्या मुलीला एका मुलासोबत नको त्या अवस्थेत पाहून आईला धक्काच बसला. तिने सुरजच्या कानफाटात जोरदार ठेऊन दिली आणि नंतर चांगलाच समाचार घेतला व पोलिसात तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी सुरजविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीonlineऑनलाइनSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम