लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नऊ वर्षांच्या मुलाची हत्या करून एका महिलेने आत्महत्या केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रवेशनगरात बुधवारी रात्री १०च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे.उमर इमरान शफी (वय ९ वर्षे) असे मृत चिमुकल्याचे तर त्याचा जीव घेणाऱ्या महिलेचे नाव अमरिन बी इरफान शफी (वय ३०) असे आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मृत अमरिनचा पहिला पती इमरान दिल्लीत राहतो. त्याने काडीमोड घेतल्यानंतर अमरिनने सय्यद रजा ऊर्फ दाऊदसोबत दुसरा घरठाव केला. आधीच्या पतीपासून अमरिनला उमर होता, तर रजापासून तिला ममतशा (वय ४ वर्षे) झाली. रजा वाहनचालक आहे. मोमिनपुºयात राहणारे हे कुटुंब काही दिवसांपूर्वीच प्रवेशनगरातील रहेमान हॉटेलच्या बाजूला इजराईल खानच्या घरी भाड्याने राहायला आले. बुधवारी रात्री १० च्या सुमारास रजा घरी नव्हता. त्यावेळी उमर आणि ममतशा झोपण्याच्या तयारीत असताना अचानक अमरिनला काय झाले कळायला मार्ग नाही. तिने सिलिंग फॅनला गळफास बांधून चिमुकल्या उमरला फासावर टांगले. त्याची हत्या केल्यानंतर अमरिनने स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली.
चिमुकली हादरलीआधी भाऊ आणि नंतर आई तडफडत गप्प झाल्याचे पाहून चिमुकली ममतशा हादरली. तिला हत्या, आत्महत्यासारखा प्रकार कळण्याचा प्रश्न नव्हता. मात्र, काही तरी भयंकर घडल्याचे तिच्या लक्षात आल्याने ती रडत रडत खाली आली आणि तिने घरमालकाला हा प्रकार सांगितला. काही तरी वेगळे घडले, असे संकेत ममतशाच्या सांगण्यावरून मिळाल्याने घरमालकाने लगेच वर धाव घेतली. आतमधील भयंकर प्रकार पाहून त्यांनी लगेच यशोधरानगर पोलिसांना माहिती कळविली. पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. चिमुकला उमर आणि अमरिनला मेयोत नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. पोलिसांनी शहनाज शेख मोहम्मद जीमल (वय ३५) यांच्या तक्रारीवरून हत्या आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
सीडीआर काढलापोलिसांनी अमरिनच्या घराची झडती घेतली असता, एक मोबाईल आणि सुसाईड नोट आढळली. त्यात घरगुती कारणामुळे हे आत्मघाती कृत्य करीत असल्याचे तिने लिहिले आहे, असे पोलीस सांगतात. पोलिसांनी मोबाईलचा सीडीआर काढला असता, त्यात रात्री ८ वाजतापासून ९.३० पर्यंत अमरिनने तिच्या पतीच्या मोबाईलवर कॉल केल्याचे स्पष्ट झाले. रजा बुधवारी रात्री ८ वाजतापासून मोमिनपुऱ्यात गेला होता. त्यामुळे पोलिसांनी रजाला विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले. अमरिनने घरगुती कारणामुळे हे कृत्य केल्याचे म्हटले असले तरी नेमके कारण कोणते, ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते.मुलाची हत्या करूनआईची आत्महत्यापाहून चिमुकली ममतशा हादरली. तिला हत्या, आत्महत्यासारखा प्रकार कळण्याचा प्रश्न नव्हता. मात्र, काही तरी भयंकर घडल्याचे तिच्या लक्षात आल्याने ती रडत रडत खाली आली आणि तिने घरमालकाला हा प्रकार सांगितला. काही तरी वेगळे घडले, असे संकेत ममतशाच्या सांगण्यावरून मिळाल्याने घरमालकाने लगेच वर धाव घेतली. आतमधील भयंकर प्रकार पाहून त्यांनी लगेच यशोधरानगर पोलिसांना माहिती कळविली. पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. चिमुकला उमर आणि अमरिनला मेयोत नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. पोलिसांनी शहनाज शेख मोहम्मद जीमल (वय ३५) यांच्या तक्रारीवरून हत्या आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.—-—-