तीन महिन्यांच्या मुलाच्या ताब्यासाठी आई हायकोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:09 PM2019-09-25T23:09:24+5:302019-09-25T23:11:26+5:30

वडिलाने सोबत नेलेल्या तीन महिन्यांच्या मुलाचा ताबा मिळावा याकरिता आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

Mother in high court for custody of three-month-old son | तीन महिन्यांच्या मुलाच्या ताब्यासाठी आई हायकोर्टात

तीन महिन्यांच्या मुलाच्या ताब्यासाठी आई हायकोर्टात

Next
ठळक मुद्देवडिलाने सोबत नेले : मुलाला न्यायालयात आणण्याचा आदेश

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : वडिलाने सोबत नेलेल्या तीन महिन्यांच्या मुलाचा ताबा मिळावा याकरिता आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.
रिना कनोजे असे आईचे तर, योगेश असे वडिलांचे नाव असून ते अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या प्रकरणावर बुधवारी न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने योगेश कनोजे, अकोला पोलीस अधीक्षक व मूर्तिजापूरचे पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून येत्या २७ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. तसेच, या तारखेला मुलासही न्यायालयात आणण्यास सांगितले. योगेशने पोलिसांसोबत येण्यास नकार दिल्यास मुलाला त्याच्या याचिकाकर्त्या आईसोबत न्यायालयात घेऊन यावे असेदेखील आदेशात स्पष्ट करण्यात आले.
रिनाने योगेश व सासू-सासरे हुंड्यासाठी छळ करीत असल्याची तक्रार मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. त्यासंदर्भातील खटला मूर्तिजापूर येथील फौजदारी न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान, दोन्ही पक्षकार पोलीस ठाण्यातील महिला कक्षात उपस्थित असताना रिनाच्या ताब्यात असलेल्या मुलाला योगेश बळजबरीने सोबत घेऊन गेला. त्यावेळी मुलगा केवळ दोन महिन्यांचा होता. त्या घटनेचा रिनाला जोरदार मानसिक धक्का बसला. त्यामुळे तिच्यावर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उच्च न्यायालयात याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. संतोष चांडे व अ‍ॅड. राजू कडू यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Mother in high court for custody of three-month-old son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.