शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

तीन महिन्यांच्या मुलाच्या ताब्यासाठी आई हायकोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:09 PM

वडिलाने सोबत नेलेल्या तीन महिन्यांच्या मुलाचा ताबा मिळावा याकरिता आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देवडिलाने सोबत नेले : मुलाला न्यायालयात आणण्याचा आदेश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वडिलाने सोबत नेलेल्या तीन महिन्यांच्या मुलाचा ताबा मिळावा याकरिता आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.रिना कनोजे असे आईचे तर, योगेश असे वडिलांचे नाव असून ते अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या प्रकरणावर बुधवारी न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने योगेश कनोजे, अकोला पोलीस अधीक्षक व मूर्तिजापूरचे पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून येत्या २७ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. तसेच, या तारखेला मुलासही न्यायालयात आणण्यास सांगितले. योगेशने पोलिसांसोबत येण्यास नकार दिल्यास मुलाला त्याच्या याचिकाकर्त्या आईसोबत न्यायालयात घेऊन यावे असेदेखील आदेशात स्पष्ट करण्यात आले.रिनाने योगेश व सासू-सासरे हुंड्यासाठी छळ करीत असल्याची तक्रार मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. त्यासंदर्भातील खटला मूर्तिजापूर येथील फौजदारी न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान, दोन्ही पक्षकार पोलीस ठाण्यातील महिला कक्षात उपस्थित असताना रिनाच्या ताब्यात असलेल्या मुलाला योगेश बळजबरीने सोबत घेऊन गेला. त्यावेळी मुलगा केवळ दोन महिन्यांचा होता. त्या घटनेचा रिनाला जोरदार मानसिक धक्का बसला. त्यामुळे तिच्यावर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उच्च न्यायालयात याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. संतोष चांडे व अ‍ॅड. राजू कडू यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयDomestic Violenceघरगुती हिंसा