कौटुंबिक सदस्यांची अभिनव स्पर्धानागपूर : घर म्हटलं की सासू-सुनेचे नाते हे अग्रस्थानी असते. सासू आपला हक्क सोडायला तयार नसते आणि नवीन घरात राज्य करायला सून आतूर असते. अशातच खेळीमेळीच्या संसारात भांड्यांचा आवाज यायला लागतो. कधी सासू वरचढ ठरते तर कधी सुनेचा विजय होतो. असेच आंबट गोड नात्याचे विविध पैलू उलगडणारा ‘सासू सून जोडी नं.१’ या मनोरंजनात्मक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जीवनातील अनेक प्रसंग दाखविणारे कौटुंबिक चॅनल कलर्स आणि महिलांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देणारे लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या कौटुंबिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात होणार आहे. कलर्स चॅनलवरील विविध सासू-सुनेच्या जोडीशी सर्वच जण अवगत आहे. ‘ससुराल सिमर का’ मध्ये सून सिमर आणि सासू सुजाता या जोडीला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या कुटुंबासाठी सुनेचा त्याग, तिचे प्रेम, तिची जबाबदारी, कर्तव्य आणि सासूकडून मिळत असलेले समर्थन या मालिकेत दाखविण्यात आले आहे. ‘मेरी आशिकी तुमसे है’ मध्ये ईशानी आणि सासू अंबा यांच्या नात्यात बा आणि त्याची सुनेच्या भूमिकेला वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आले आहे. प्रेक्षकांना कलर्समध्ये अशाच परंतु अनेक भूमिकेतील सासू आणि सून यांच्या जोड्या दिसून येतात. परंतु ‘रिअल लाईफ’मध्ये सासू-सुनांच्या नात्यातला भक्कम आधार शोधून त्यांच्यामध्ये असलेली नात्याची नाजूक वीण, त्यामध्ये असलेला हळुवारपणा, अलगद आलेल्या विचारांना सासू-सुनांचा येणारा प्रतिसाद, त्यांच्या नात्याची सकारात्मक आणि नकारात्मक बाजू या सर्व गोष्टी ‘सासू-सून जोडी नं.१’मध्ये दिसून येणार आहे. ही एक स्पर्धा आहे. चार फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. पहिल्या फेरीत स्पर्धकांना स्वत:ची ओळख द्यायची आहे. दुसरी फेरी टॅलेंट राऊंड असेल. तिसरी ‘मॅचिंग’ फेरी आणि चौथी परीक्षक फेरी असणार आहे. यात सासू व सुनेला काही प्रश्न विचारण्यात येतील. ही स्पर्धा नि:शुल्क आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येत सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.या स्पर्धेसोबतच उपस्थित सखींसाठी ‘जोडी नंबर १’ ही मनोरंजक स्पर्धाही घेण्यात येईल. यातील विजेत्यांना आकर्षक पुरस्कार देण्यात येतील. या दोन्ही स्पर्धेला संगीत, नाट्य, गीत, नृत्य, अभिनय याची झलक असणार आहे. कार्यक्रम पाहण्यासाठी येणाऱ्या सखी मंचच्या सर्व सखी सहकुटुंब आमंत्रित आहे. ‘सासू-सून जोडी नं.१’ या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सखींना लोकमत सखी मंच कार्यालयात येऊन एक अर्ज भरावा लागेल. कार्यक्रमाच्या प्रवेशासाठी फोनवर एसएमएस द्वारा नि:शुल्क नोंदणी करावी. यासाठी ९९२२९६८५२६, ९८२२४०६५६२, ९८८१७४९३९०, ९८५०३०४०३७ किंवा ९९२२९१५०३५ या मोबाईलवर व अधिक माहितीसाठी २४२९३५५ यावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)
‘सासू-सून जोडी नं.१’ बुधवारी कलर्स व लोकमत सखी मंचचा उपक्रम :
By admin | Published: December 21, 2015 3:20 AM