शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

चिमुकल्यांना वाऱ्यावर सोडून जन्मदात्रीचे पलायन; रेल्वेस्थानकाच्या फलाटावर आढळल्या दोन बहिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 5:55 PM

पोलिसांनी फलाटावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक महिला या दोन मुलींना फलाटावर सोडून निघून गेल्याचे दिसून आले. ही महिला कोण, कुठली व कुठे आहे, ते स्पष्ट न झाल्यामुळे पोलिसांनी या दोन मुलींना खासगी बालगृहात दाखल केले.

ठळक मुद्देबहिणी बालगृहात दाखल; रेल्वे पोलिसांकडून पाच दिवसांपासून शोधाशोध

नागपूर : दोन चिमुकल्यांना वाऱ्यावर सोडून त्यांची जन्मदात्री निघून गेली. आता या घटनेला पाच दिवस झाले. अवघ्या दीड आणि तीन वर्षे वय असलेल्या या दोघी निट बोलू शकत नाही अन् आईवडील अथवा ईतर नातेवाईकांबाबत माहितीही देऊ शकत नाही. मात्र, खुद्द आईनेच त्यांना वाऱ्यावर सोडून पळ काढल्याने त्या दोघी बहिणी कावऱ्याबावऱ्या झाल्या आहेत.

२६ मे रोजी मध्यरात्री १.३० वाजता दीड वर्षांची पिंकी तसेच तीन वर्षांची किर्ती येथील मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर सैरभैर अवस्थेत चाईल्ड लाईनच्या सदस्यांना दिसल्या. सदस्यांनी त्यांच्या जवळ जाऊन आईवडिलांबाबत विचारणा केली असता त्या व्यवस्थीत माहिती देऊ शकल्या नाही. त्यामुळे चाईल्ड लाईनच्या सदस्यांनी त्यांना लोहमार्ग पोलीस ठाण्यात (जीआरपी) आणून सोडले. पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसर आणि फलाटावर या दोन मुलींच्या पालकांना शोधण्याचा प्रयत्न केला. अनेकांकडे विचारपूसही केली. मात्र, त्यांची माहिती पोलिसांना उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे पोलिसांनी नंतर फलाटावरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यात एक महिला या दोन मुलींना फलाटावर सोडून निघून गेल्याचे दिसून आले. ही महिला कोण, कुठली आणि ती कुठे आहे, ते स्पष्ट न झाल्यामुळे पोलिसांनी या दोन मुलींना श्रद्धानंदपेठेतील खासगी बालगृहात दाखल केले.

पोटच्या मुलींना तिने असे बेवारस का सोडले ?

सीसीटीव्हीत दिसणारी महिला अत्यंत गरिब कुटुंबातील दिसते. रस्त्याच्या बाजुला फुटपाथवर अथवा अशाच कोणत्याही ठिकाणी ती राहत असावी, असा अंदाज प्राथमिक चाैकशीनंतर पोलिसांनी बांधला आहे. मात्र, तिने आपल्या पोटच्या मुलींना असे बेवारस का सोडले, ते स्पष्ट झाले नाही. ती हाती लागल्यानंतरच या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. रेल्वे पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वेnagpurनागपूर