शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

माता, मातृभूमी, मातृभाषा प्रत्येक व्यक्तीचे अस्तित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:19 AM

माता, मातृभूमी आणि मातृभाषेमुळे प्रत्येक व्यक्तीचे अस्तित्व टिकून आहे, या तीन बाबींमुळेच व्यक्ती खऱ्या अर्थाने घडते. त्यामुळे प्रत्येकाने आपली भाषा विसरायला नको, अशी भावना पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देहिंदी पत्रकार संघाच्या परिसंवादात पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांची भावना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माता, मातृभूमी आणि मातृभाषेमुळे प्रत्येक व्यक्तीचे अस्तित्व टिकून आहे, या तीन बाबींमुळेच व्यक्ती खऱ्या अर्थाने घडते. त्यामुळे प्रत्येकाने आपली भाषा विसरायला नको, अशी भावना पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केली.शुक्रवारी टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात हिंदी दिवस आणि हिंदीपत्रकार संघाच्या उद्घाटन समारंभात ‘हिंदी पत्रकारिता : दशा व दिशा’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. भूषणकुमार उपाध्याय होते. प्रमुख वक्ते म्हणून लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, दैनिक भास्करचे मनिकांत सोनी, नवभारतचे निवासी संपादक संजय तिवारी, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, श्रमिक पत्रकार संघाचे महासचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी उपस्थित होते. डॉ. उपाध्याय म्हणाले, भाषा कौशल्य व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचा मोठा आधार आहे. हिंदी भाषेचा वापर इतर भाषांना जोडण्यासाठी व्हावयास हवा. राजभाषेच्या रुपाने हिंदीच्या विकासासोबतच मातृभाषेचे आणि प्रादेशिक भाषांचे जतन होणे आवश्यक आहे. सामान्य शब्दांचा अधिक वापर होणे महत्वाचे आहे. भाषेचे महत्त्व दाखविण्यासाठी न ऐकलेल्या शब्दांचा वापर केल्यामुळे अनेकदा हास्यास्पद स्थिती निर्माण होते. त्यांनी वृत्तपत्रांच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना सांगितले की, चित्रपटानंतर वृत्तपत्रच असे माध्यम आहे जो समाजावर थेट प्रभाव टाकते. राजभाषेच्या रुपाने हिंदी भाषेची वाढ होण्यासाठी वृत्तपत्रांनी जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. हिंदी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर पुरोहित यांनी परिसंवादाच्या विषयाची माहिती दिली. महासचिव मनीष सोनी यांनी प्रास्ताविक केले. संचालन राजेश्वर मिश्र यांनी केले. आभार मनोज चौबे यांनी मानले. पाहुण्यांचे स्वागत कमल शर्मा, रघुनाथसिंह लोधी, जगदीश जोशी यांनी केले.ठोस उपाययोजना होण्याची गरजलोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र म्हणाले, पत्रकारितेतील नव्या पिढीला योग्य दिशा देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. वेळेनुसार पत्रकारितेचे स्वरुप झपाट्याने बदलत आहे. पूर्वी गुरु मार्गदर्शन करायचे. आता गॉडफादर आहेत. भाषा कौशल्य प्राप्त करण्यासाठी साहित्य आणि इतर पुस्तकांचे वाचन गरजेचे आहे. सध्याच्या युगात वृत्तपत्रही न वाचणाºया पत्रकारांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.दैनिक भास्करचे संपादक मनिकांत सोनी म्हणाले, पत्रकारितेच्या क्षेत्रात विविध बदल झाल्यानंतरही हिंदी व वृत्तपत्रांचे महत्त्व कमी झालेले नाही. इतर भाषांच्या तुलनेत हिंदी बोलणाºयांची संख्या वाढत आहे. डिजिटल मीडियाचे नवे आव्हान समोर आले आहे. टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र म्हणाले, भाषेची आपली ताकद असते. हिंदी भाषेवर पकड नसल्यामुळे राजकीय नेत्यांना अडचण येते. लोकप्रिय असूनही त्यांची प्रतिमा उंचावत नाही. श्रमिक पत्रकार संघाचे महासचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात बौद्धिक तसेच इतर कार्य करण्यासाठी हिंदी पत्रकार संघाच्या सर्व संकल्पांना सहकार्याची गरज आहे, असे सांगितले. कार्यक्रमाला आमदार प्रकाश गजभिये, महापालिकेचे माजी सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी, भाजपाचे वरिष्ठ नेता जयप्रकाश गुप्ता, लोकमत समाचारचे कार्यकारी संपादक किरण मोघे, उमाकांत अग्निहोत्री, अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे संचालक डॉ. पी. शिवस्वरुप, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. धर्मेश धवनकर, एस. पी. सिंह, बाबा मेंढे, मनीष त्रिवेदी, पंजू तोतवानी, सोहेल खान, निशांत गांधी, विनोद चतुर्वेदी, हरीश गणेशानी, महेश तिवारी, कृष्ण नागपाल, नरेंद्र सतीजा, अनिल शर्मा, विनोद जेठानी, पुष्पा उदासी, इरशाद अली, रविनीश पांडेय, टिंकू दिगवा, गुड्डु रहांगडाले, जयप्रकाश पारेख , रामकृष्ण गुप्ता, डॉ. गोविंद प्रसाद उपाध्याय, नितीन तिवारी, प्रवीण सिंह, योगेश विटणकर, महेंद्र जिचकार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

टॅग्स :Journalistपत्रकारhindiहिंदी