लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - सतत मोबाईलमध्ये गुंतून राहत असल्यामुळे आईने हटकल्याने गिट्टीखदानमधील एका तरुणीने गळफास लावून घेतला.
राणी विजय वाघमारे (वय २०) हिचे ११ वी पर्यंत शिक्षण झाले आहे. तिचे आई-वडील खासगी काम करतात. राणी सारखी मोबाईलमध्ये गुंतून राहत असल्याने तिच्या आईने तिला मंगळवारी हटकले. त्यावरून ती संतप्त झाली. तिने रागाच्या भरात गळफास लावून घेतला. बुधवारी सकाळी ६ वाजता ही घटना उघडकीस आली. विजय हिरामनजी वाघमारे (४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.