शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

नागपूर जिल्ह्यात आईची दोन वर्षांच्या चिमुकल्यासह आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 11:30 PM

कौटुंबिक कलह टोकाला गेल्याने दोन वर्षांच्या चिमुकल्यासह आईने स्वत: जग कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच तिने तलावात उडी घेतली. गावातील तरुणास दोघांचेही मृतदेह तलावाच्या पाण्यावर तरंगताना दिसताच खळबळ उडाली. ही हृदयद्रावक घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांद नजीकच्या लोणारा शिवारात शनिवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देलोणारा शिवारातील घटना : कौटुंबिक कलहातून तलावात घेतली उडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कौटुंबिक कलह टोकाला गेल्याने दोन वर्षांच्या चिमुकल्यासह आईने स्वत: जग कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच तिने तलावात उडी घेतली. गावातील तरुणास दोघांचेही मृतदेह तलावाच्या पाण्यावर तरंगताना दिसताच खळबळ उडाली. ही हृदयद्रावक घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांद नजीकच्या लोणारा शिवारात शनिवारी सकाळी उघडकीस आली.अश्विना प्रशांत डडमल (२४) व ओमश्री प्रशांत डडमल (२), रा. लोणारा, ता. भिवापूर अशी या दुर्दैवी आई व चिमुकल्याची नावे आहेत. अश्विना व प्रशांतला चार वर्षांची आराध्या व ओमश्री अशी दोन अपत्ये. अश्विना शुक्रवारी (दि. ३) सकाळी १० वाजताच्या सुमारास जेवण आटोपल्यानंतर शेजारी टीव्ही पाहण्यासाठी जात असल्याचे पती प्रशांतला सांगून ओमश्रीला सोबत घेऊन घराबाहेर पडली. तत्पूर्वी तिने आराध्याला शेजारी पाठविले होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास ती घरी परत न आल्याने प्रशांतने शेजारी चौकशी केली. ती व ओमश्री तिथे नसल्याने गावात सर्वत्र शोध घेतला, मात्र थांगपत्ता लागला नाही. ती माहेरी गेली असावी, असे समजून प्रशांतने शोधकार्य थांबविले.दरम्यान, शनिवारी सकाळी त्या दोघांचेही मृतदेह लोणारा शिवारातील तलाव क्रमांक-१ मध्ये तरंगताना स्थानिक तरुणाला आढळून आले. त्याने याबाबत लगेच प्रशांतला माहिती दिली. त्यांची ओळख पटताच पोलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा तावरे यांच्यासह भिवापूर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.प्रशांत-अश्विनाचा प्रेमविवाहप्रशांत व अश्विना दोघेही एकाच गावातील रहिवासी असून, त्यांनी पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. प्रशांत ट्रॅक्टरचालक असून, प्रसंगी मजुरीही करतो. प्रशांतचे अश्विनाचे वडील गणपत श्रीरामे यांच्याशी सुरुवातीपासून फारसे पटत नव्हते. त्यामुळे त्यांचे संबंधही तसे तणावाचेच आहे. अश्विनाही तिच्या आईला भेटण्यासाठी वडील घरी नसताना जायची.पतीविरुद्ध गुन्हा दाखलया प्रकरणी अश्विनाचे वडील गणपत कवडूजी श्रीरामे यांनी भिवापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. अश्विनाच्या सासरची मंडळी तिला त्रास द्यायची. त्या त्रासाला कंटाळून तिने टोकाची भूमिका घेतली, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्या आधारे भिवापूर पोलिसांनी पती प्रशांत ऊर्फ परसराम शंकर डडमल (३५), सासरा शंकर भानाराव डडमल (६०) व सासूविरुद्ध भादंवि ४८९ (अ ), ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वृत्त लिहिस्तो कुणालाही अटक करण्यात आली नव्हती.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर