लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘ब्रेन स्ट्रोक’मुळे कोमात जाऊन पुढे ‘ब्रेन डेड’ झालेल्या ३८ वर्षीय मुलाच्या अवयवदानासाठी त्याची आई, पत्नी आणि बहिणीने पुढाकार घेतला. असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने चौघांना जीवनदान मिळाले.प्रकाश लक्ष्मीनारायण ओमरे (३८) रा. देशराजनगर सुरेंद्रगड, सेमिनरी हिल्स, असे त्या अवयवदात्याचे नाव.प्राप्त माहितीनुसार, २ जुलै रोजी प्रकाशला अचानक ‘ब्रेन स्ट्रोक’आला. तातडीने त्याला ‘एलेक्सिस’ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच तो कोमात गेला. ५ जुलै रोजी डॉक्टरांनी प्रकाशचा ‘मेंदू मृत’ म्हणजे ‘ब्रेन डेड’ झाल्याचे नातेवाईकांना सांगितले. तरुण मुलाच्या अचानक मृत्यूने आई, त्याच्या पत्नीसह संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. डॉक्टरांनी नातेवाईकांना अवयवदानाचा सल्ला दिला. ‘झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन सेंटर’च्या (झेडटीसीसी) झोन कॉर्डिनेटर वीणा वाठोरे यांनी अवयवदानाचे महत्त्व ओमरे कुटुंबांना समजावून सांगितले. त्या दु:खातही संयम आणि मानवतावादी भूमिका घेत प्रकाशची आई मीरा, पत्नी गायत्री व बहीण ज्योती यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. ‘झेडटीसीसी’च्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्या मार्गदर्शनात वाठोरे यांनी पुढील प्रक्रिया पार पाडली. यामुळे हृदय मुंबई येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील एका रुग्णाला, यकृत एलेक्सिस येथील ५८ वर्षीय महिलेला, मूत्रपिंड लकडगंज येथील न्यू ईरा हॉस्पिटलमधील ५१ वर्षीय महिलेला तर दुसरे मूत्रपिंड हे सावंगी वर्धा येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण हॉस्पिटलमधील २९ वर्षीय पुरुष रुग्णाला देण्यात आलेग्रीन कॉरिडोरमधून हृदय व मूत्रपिंडाचा प्रवासप्रकाशचे हृदय मुंबईच्या फोर्टिस हॉस्पिटलमधील एका रुग्णाला दिले जाणार होते. विशेष म्हणजे, हृदय काढल्यानंतर चार तासाच्या आत गरजू रुग्णावर त्याचे प्रत्यारोपण होणे आवश्यक असते. यामुळे मिनिटामिनिटांचे नियोजन करण्यात आले. पोलीस उपायुक्त (वाहतूक) गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात निवृत्त एसीपी जमील अहमद यांच्या सहकार्याने एलेक्सिस हॉस्पिटल ते नागपूर विमानतळ ग्रीन कॉरिडोर करण्यात आले. यामुळे सुमारे सात मिनिटात हृदय विमानतळावर पोहचले. तर, मूत्रपिंडासाठी दुसरे ग्रीन कॉरिडोर एलेक्सिस हॉस्पिटल ते सावंगी वर्धा येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण हॉस्पिटल (एव्हीबीआरएच) रवाना करण्यात आले. या कार्यात पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, सबनीस, भांडारकर, वाघमारे, शेख आदींनी सहकार्य केले.
अवयवदानासाठी आई, पत्नी, बहिणीचा पुढाकार : हृदय गेले मुंबईला, मूत्रपिंड वर्ध्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:54 AM
‘ब्रेन स्ट्रोक’मुळे कोमात जाऊन पुढे ‘ब्रेन डेड’ झालेल्या ३८ वर्षीय मुलाच्या अवयवदानासाठी त्याची आई, पत्नी आणि बहिणीने पुढाकार घेतला. असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने चौघांना जीवनदान मिळाले.
ठळक मुद्देचौघांना मिळाले जीवनदान